Sangli Loksabha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Loksabha 2024 : भाजप निरीक्षकांकडून सांगलीत चाचपणी; 157 पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा!

Sangli BJP News : जिल्ह्यातील भाजपच्या 157 पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत व्यक्तिगतरित्या संवाद साधून लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असावा, याची माहिती घेण्यात आली. सध्या निरीक्षकांकडून सांगलीत चाचपणी सुरू आहे.

Anil Kadam

Sangli Constituency : सांगली लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवारीचा अद्याप घोळ सुरूच आहे. भाजपच्या निवडणूक निरीक्षकांनी सांगली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चाचपणी केली. जिल्ह्यातील भाजपच्या 157 पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत व्यक्तिगतरित्या संवाद साधून लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असावा, याची माहिती घेण्यात आली. विद्यमान खासदार संजय पाटील तसेच माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे नाव चर्चेत आले. पक्ष निरीक्षकांकडून गोपनीय अहवाल प्रदेश व राष्ट्रीय भाजपकडे तातडीने सादर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.Sangli Loksabha 2024

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Loksabha Election ) निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील Harshwardhan Patil तसेच वासुदेव काळे हे सांगलीत आले होते. त्यांनी जिल्ह्यातील भाजपच्या प्रदेश व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांना बैठकीला बोलावले होते. कोल्हापूर kolhapur रोडवरील आदीसागर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मोहिते फार्म - हाऊस येथे ही बैठक झाली. ही बैठक गोपनीय ठेवली होती.Sangli BJP News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजय पाटील व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख Pruthviraj Deshmukh इच्छुक आहेत. त्यामुळे प्रदेश भाजपने सांगलीत (Sangli) निवडणूक निरीक्षक धाडून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून उमेदवारीबाबत चाचपणी केली. पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांमध्ये दोन गट दिसत होते. निवडणूक निरीक्षक हर्षवर्धन पाटील व काळे यांनी बंद खोलीत प्रत्येकाशी व्यक्तिगतरित्या संवाद साधला. जे नेते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून उमेदवारीबाबचे मत नोंदवून घेतले.

खासदार पाटील यांना पक्षांतर्गत विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षातील काही नेत्यांनी खासदार पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पक्षाने सांगलीसाठी दोन निरीक्षकांना पाठवून भाजप पदाधिकाऱ्यांचे मत नोंदवून घेण्याचे आदेश दिले होते, उमेदवारीसाठी खासदार संजय पाटील Sanjay Patil व पृथ्वीराज देशमुख यांचे नाव चर्चेत आले. पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करू, अशी ग्वाहीही नेत्यांनी दिली.

जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी निरीक्षकांकडे नोंदवलेल्या मतांचा गोपनीय अहवाल प्रदेश व राष्ट्रीय भाजपला सादर केला जाणार आहे. 3 मार्च रोजी दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठकही होणार आहे. त्यामध्ये सांगली लोकसभेच्या जागेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी खासदार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT