MP SanjayKaka Patil
MP SanjayKaka Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MP SanjayKaka Patil : 'क्या हुआ तेरा वादा...?'; मिरजकरांनी खासदारांना आश्वासनाची आठवण करून दिली

Anil Kadam

Sangli News: खासदार संजयकाका पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी मिरजकरांना छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची सुधार समितीने सोशल मीडियावर पोस्ट आठवण करून दिली आहे. 'यांना आपण कुठे पाहिले आहे का?' असेही सुधार समितीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट जिल्ह्यात चांगलीच व्हायरल झाली असून, खासदार संजयकाकांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण पुन्हा एकदा मिरजकरांना या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी खासदार पाटील यांनी मिरजेतील मिशन हॉस्पिटलला भेट दिली होती. खासदार पाटील यांनी दिलेले आश्वासन नमूद करण्यात आले असून, संजय पाटील यांच्या भेटीचा फोटो लावलेला आहे. दोन वर्षांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याबाबत मिरज शहर सुधार समितीने उठाव केला होता.

मोठे आंदोलन उभे केले होते. या मार्गावरील अतिक्रमण, दर्जा, दुभाजक अशा अनेक महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देण्यात आल्या होत्या. याच दिवशी 2022 मध्ये खासदार संजय पाटील यांनी दखल घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आश्वासनही दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार पाटील यांनी स्वतः या मार्गाची पाहणी केली होती. 22 मीटरचा रस्ता, त्यात 7 मीटर अतिक्रमण, एक मीटर दुभाजक आणि सात मीटर असे सुमारे एकूण 14 मीटर रस्त्याचे विभाजन होते. त्यावेळी कुणाचीही गय करू नका, अतिक्रमण काढा, अंदाजपत्रकाप्रमाणे मार्ग झाला पाहिजे, असा सज्जड दम खासदार पाटील यांनी ठेकेदारांना दिला होता. तसेच प्राधिकरण व महापालिकेला सूचना केली होती. अतिक्रमणाबाबत कुणाची गय करू नका, असे म्हटले होते.

या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भरघोस निधी दिला आहे. कमी पडला तर आणखीन आणू, असे आश्वासन दोन वर्षांपूर्वी दिले असल्याची पोस्ट फोटोसहित सोशल मीडियावर फेसबुक पेजवर व्हायरल झाली आहे. हे झाले दोन वर्षांपूर्वीचे आश्वासन, पण सध्या हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. वाहतूक व्यवस्था बिघडून अपघात होत आहेत, यामुळे समितीने 'क्या हुआ तेरा वादा...'अशी पोस्ट करून दोन वर्षांपूर्वीच्या पोस्टचा फोटो शेअर केला आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT