Sangli News : कर्नाटक सरकार अलमट्टीची उंची पाच मीटरने वाढविण्यावर ठाम असून नुकताच याबाबत दिल्लीत बैठक झाली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन अलमट्टीची उंची वाढविण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत पुढच्या 15 दिवसांत केंद्रीय स्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागाला पुराचा फटका बसणार आहे. दरम्यान आता कर्नाटकरच्या या हट्टीपणाविरोधात सांगलीतील लोकप्रतिनिधींनी विरोधाचे रणशिंग फुंकले आहे. आता अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पूरग्रस्तांनी लावली होती बैठकीला उपस्थित.
कर्नाटक सरकारने याआधीच अलमट्टी धरणाची उंची 519 वरून 524 मीटर करण्याचे जाहीर केले आहे. याबाबत काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी देखील थेट पत्रकार परिषद घेऊन सरकार उंची वाढविण्यावर ठाम असल्याचे सांगत यासाठी निधीची तरतूद केल्याचेही सांगितले होते. तर याबाबत नुकताच केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली होती.
आता कर्नाटकच्या या मागणीचा विचार केंद्र सरकार करताना लवकरच त्याला मान्यताही देईल. तर याला आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांचा देखील विरोध आहे. यामुळेच 2013 च्या लवादाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पण महाराष्ट्र सरकारने यावर कोणताच अक्षेप घेतला नाही, असा खुलासाच याआधी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी अधिवेशनातच जाहीर केले आहे. यामुळे सांगली, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख नेत्यांचे या प्रश्नाकडे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
पण आता सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हे बंद ठेवून निषेध नोंदवण्यात येणार आहे. खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडलेल्या बैठकीत अलमट्टी उंची विरोधात लढ्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात विधानसभा आणि रस्त्यावर लढा उभारण्याचं आमदार रोहित पाटील यांनी निर्धार केला आहे. तर इतर जिल्ह्यातील आमदार - खासदारांना एकत्र येण्याचे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या 524 मीटर उंचीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला अधिकचा धोका निर्माण होण्याची भीती देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.