Almatti Dam : 'आलमट्टी’च्या उंचीचा घाट? कर्नाटकचे मनसुबे भाजप मंत्री विखे उधळणार, 'सर्वोच्च' न्यायालयात घेरणार

Radhakrishna Vikhe Patil : आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. तर या गोष्टीला महाराष्ट्र सरकारने विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. यानंतर आता महाराष्ट्र सरकार हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे.
Radhakrishna Vikhe-Patil
Radhakrishna Vikhe-PatilSarkarnama
Published on
Updated on

kolhapur/Sangli/Mumbai News : आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. याबाबत सरकारने अंतिम तयारी केल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न मांडला होता. तर महाराष्ट्र सरकारने कोणताच विरोध याला केला नसल्याचे प्राप्त उत्तरात मिळाले होते. यानंतर कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यातील जनतेनं सरकारविरोधात रोष प्रकट केला होता. तर राज्य सरकारने याबाबत विरोध करावा, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली असून याबाबत गोदावरी आणि कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माहिती दिली आहे. आलमट्टी धरणाची उंचीला महाराष्ट्र सरकारचा कायमच विरोध होता आणि यापुढेही राहील, असेही त्यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे. तर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून राज्य सरकारमार्फत हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी (ता.11) याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर देताना याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, या धरणाची उंची वाढवण्यासाठी संबंधित लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिलेली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र या प्रकरणात न्यायालयाने अंतिम निर्णय देताना महाराष्ट्र सरकारचे मत विचारात घ्यावे, यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.

आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पावसाळ्यात पुराचा मोठा फटका बसतो. त्यात आता कर्नाटक सरकार धरणाची उंची पुन्हा वाढवणार आहे. यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापुरमधील शेती आणि जनजीवन पाण्याखाली जाणार आहे.

Radhakrishna Vikhe-Patil
Almatti Dam : केंद्रीय मंत्र्यांच्या उत्तराने कोल्हापूर, सांगलीतील पुढारी उघडे पडले; अलमट्टी विरोधाचा वरवरचा राजकीय स्टंट

तर सध्या निर्माण होणाऱ्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. कर्नाटक सरकारशी समन्वय साधण्याचा प्रयत्न असून, त्याला कर्नाटक सरकारने सहमती दर्शवली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe-Patil
Almatti Dam Height : महाराष्ट्र सरकार धृतराष्ट्र !, 'आलमट्टी'च्या वाढीव उंचीला विरोध नाहीच; केंद्रीय मंत्र्यानेच दिले उत्तर

याआधी देखील कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारचा कायम विरोध आहे. याबाबतची सरकारची लेखी भूमिका केंद्र सरकारला पाठवली आहे. आमच्यासह आंध्र आणि तेलंगणा सरकारनेही आलमट्टी धरणाची उंची वाढवू नका, अशी भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com