Satara, 16 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आज शिवसेनेनेही आपल्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकांमध्ये दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी भाजपविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील बैठकीत महायुतीमधील तिढा सुटला असून तीनही पक्षांनी एकत्रित काम करण्याची सूचना दिल्याची चर्चा होती. त्यावर शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या स्टाईलकडे लक्ष वेधले आहे.
सांगली-सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे या लढतीची राज्यात चर्चा आहे.
मतदारसंघातील संख्याबळ पाहता भाजपला विजयासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गरज भासणार आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी आपले पत्ते अद्याप ओपन केलेले नाहीत, त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे. आता वरिष्ठ पातळीकडे दोन्ही जिल्ह्यातील नेतेमंडळींचे डोळे लागले आहेत.
मुंबईत महायुतीमधील तीन पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यात तीनही पक्षांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यावर पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, साताऱ्यातील तिढा सुटल्याचा कोणताही आदेश किंवा निरोप आम्हाला आमच्या पक्षाकडून आलेला नाही, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आदेश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही तिढा सुटला, या प्रकारावर बोलणार नाही.
भाजपविरोधात काळजीपूर्वक बोलतोय
भाजप बहुमताच्या जवळ आहे, त्यांमुळे त्यांना गॅसवर राहण्याची गरज नाही. भाजपचे लोकच आम्ही बहुमताच्या जवळ आहोत, असं सांगत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्याविरोधात जास्त बोलून उपयोग नाही. आम्हीसुद्धा आता काळजीपूर्वक पावलं टाकतोय. भाजपला दुखावून किंवा त्यांच्या विरोधात बोलून त्याचे विनाकारण आपल्याला परिणाम भोगावे लागू नयेत, याची काळजी घेतोय, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.