Satara Shivsena : एकही मत इकडं-तिकडं जाणार नाही; पण आमच्या भावना शिंदेसाहेबांपर्यंत पोचवा : साताऱ्यातील शिवसेना सदस्य आक्रमक

Sangli-satara Vidhan Parishad Election 2026 : शिवसेनेचे सदस्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करतील आणि एकही मत फुटणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
Satara Shivsena Meeting
Satara Shivsena MeetingSarkarnama
Published on
Updated on

Satara, 16 June : शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांच्या भावना कोअर कमिटीने तासभर ऐकून घेतल्या आहेत. आमच्या भावना शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचवा. शिंदे जो निर्णय देतील, त्या आदेशाच्या बाहेर आम्ही कोणी नाही. त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल, एकही मत इकडे-तिकडे जाणार नाही, असा शब्द शिवसेना सदस्यांनी दिल्याचे शिवसेना नेते तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा (Satara) जिल्ह्यातील शिवसेनेच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि सभापती यांची बैठक साताऱ्यात झाली. त्या बैठकीत सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देसाई यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत मतदान कोणाला करायचं, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना आज सांयकाळपर्यंत जशाच्या तशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचवल्या जातील. शिंदे जो आदेश देतील, त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ.

त्या वेळी माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली होती

सांगलीतील तानाजी पाटील यांनी विधान परिषदेसाठी जो अर्ज भरला होता, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विनंतीवरून माघारी घेण्यात आला. त्यासाठी तानाजी पाटील यांना घेऊन मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली होती.

Satara Shivsena Meeting
MLC Election : सोलापूर विधान परिषद निवडणुकीबाबत गोरेंना मोठा कॉन्फिडन्स : राजेंद्र राऊत भाजपच्या मतांपेक्षा 200 पेक्षा अधिकची मतं

आमदार सुहास बाबर यांना सांगलीचे अधिकार

सांगलीचा निर्णय घेण्याचे अधिकार हे आमदार सुहास बाबर यांना देण्यात आलेले आहेत. त्यांनी सर्व सदस्यांची बैठक घेतली आहे. मुख्य नेत्यांचा जो आदेश येईल. त्याचं पालन सातारा आणि सांगलीत होईल. एकनाथ शिंदे जो आदेश देतील, त्याप्रमाणे एकही मत बाजूला जाऊ न देता शिवसेनेचं सगळं मतदान करणं, हा आजच्या बैठकीतील निर्णय आहे.

इतक्या लवकर शेवट होत नसतो

भाजपकडून मला कोणीही व्यक्तीगत संपर्क साधलेला नाही. झेडपीतील वादावर भाजपने सुरुवात केली आहे, शेवट आम्ही करणार, असा इशारा शंभूराज देसाई यांनी त्या वेळी दिला होता. त्याची आठवण करून देताच ‘इतक्या लवकर शेवट होत नसतो. जरा दम धरा, दमानं घ्या जरा,’ असे देसाई यांनी दिले. उत्तर दिले.

Satara Shivsena Meeting
Sangli-Satara MLC : सांगली-सातारा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचा निर्णय झाला; भाजपच्या बड्या मंत्र्याने मकरंदआबांचं नाव घेत केला मोठा दावा

नवनाथ बन खूप मोठे प्रवक्ते

कुठल्या गाडीत बसायचं कळत नसेल तर एकनाथ शिंदेंना भेटा, ते सांगतील कुठल्या गाडीत बसायचं, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली होती. त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, नवनाथ बन हे नव्याने झालेले खूप मोठे प्रवक्ते आहेत, त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. त्यामुळे अशा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रवक्त्याविषी आमच्यासारख्या छोट्या माणसांनी वक्तव्य करणं योग्य नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com