Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप नडले अन् भिडलेही; आता विधानसभेला जयकुमार गोरेंची धाकधूक वाढली

Dhairyashil Kadam Victory : सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. मतमोजणीत कदम यांना ५९३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. त्यामुळे कदम यांनी ३०१ मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. एकूण या निवडणुकीत ९ मते अवैध ठरली.

Rahul Gadkar

Sangli News, 22 Jun : सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने विजय संपादन केला असला तरी माणमधून विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि महाविकास आघाडीने मंत्री जयकुमार गोरे यांना दाखवला आहे. या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी बाजी मारली आहे.

मात्र, अपक्षांनी फिरवलेली पाठ आणि महायुतीतील फुटलेली मत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना पडलेली मते लक्षवेधी आहेत. जवळपास 200 च्या आसपास असलेल्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत 292 इतकी मते पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. मतमोजणीत कदम यांना ५९३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. त्यामुळे कदम यांनी ३०१ मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. एकूण या निवडणुकीत ९ मते अवैध ठरली.

या निवडणुकीत एकूण ८९५ मतदारांपैकी ८९४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सांगली व सातारा जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. निकाल जाहीर होताच सांगली व सातारा जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.

एकंदरीतच पाहता महायुतीकडे सर्वाधिक 650 अधिक मतदार, तर महाविकास आघाडीकडे 190 तर अपक्ष 52 इतकी मते होती. महायुतीकडून अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला होता. मात्र प्रत्यक्ष मतदानानंतर वेगळेच चित्र दिसून आले. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबत असलेली नाराजी स्पष्टपणे या मतदानातून दिसून आली.

अपक्षांसह महायुतीतील जवळपास 50 ते 60 जणांनी अभयसिंह जगताप यांच्या पारड्यात मते टाकल्याचे दिसून येते. शिवाय जगताप यांना पाठिंबा दिल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत माण विधानसभा मतदारसंघातून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते.

या निवडणुकीत जगताप यांना आपला पराभव माहीत असताना देखील त्यांनी संख्याबळापेक्षा मिळवलेली अधिक मते ही पुढील विधानसभा निवडणुकीची ट्रायल आहे. असेच संकेत या माध्यमातून देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT