

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, मंत्री उदय सामंत गिरीष महाजन अशा महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांनी गीते यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी मोठे प्रयत्न केले.
मात्र, त्यांनी आपला अर्ज कायम ठेवत दराडे यांना पाठिंबा दिला होता. अशातच आता नाशिक विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबर धक्का बसला. एकनाथ शिंदे यांचे राजकारण पिछाडीवर गेले आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते यांना अनपेक्षित विजय मिळाला आहे.
गेले आठ दिवस पडद्यामागे घडलेल्या राजकीय घडामोडी यशस्वी झाल्या. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा शॉक बसला आहे. आज झालेल्या मतमोजणीत अपक्ष गोकुळ गीते यांना 357, शिवसेना एकनाथ शिंदे अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४७ तर 13 मते बाद झाली.
दराडे यांना भाजप आणि स्वतःच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनीही कात्रजचा घाट दाखवला हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या दृष्टिकोनातून नाशिक विधान परिषद निवडणुकीने वेगळा संदेश दिला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात १८ जूनला मतदान झाले. त्यात ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले. मालेगावचे 'एमआयएम' चे एक नगरसेवक हज यात्रेला गेल्याने त्यांचे मतदान झाले नाही.
आज सकाळी आठ पासून नाशिक शहरात मतमोजणी होत आहे. त्याची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला महायुती उमेदवार नरेंद्र दराडे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्या समर्थकांमध्ये निकालाबाबत विविध चर्चा सुरू होत्या. विशेषत: अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीला प्रचार थांबविण्याचे आश्वासन दिले. मात्र नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला नाही. यामध्ये मोठी राजकीय खेळी असल्याचे लपून राहिलेले नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोकुळ गीते यांच्या माघारी साठी ठाणे येथे बैठक झाली. शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि अपक्ष गोकुळ गीते दोन्ही उमेदवार यावेळी उपस्थित होते. या बैठकीत गीते यांना महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या वतीने माघारीसाठी तडजोड म्हणून गीते यांच्या अटी मान्य करत काही भरपाई करण्यात आले, असे बोलले जाते.
या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी शेवटपर्यंत महायुतीचे उमेदवार दराडे यांना आपल्या मनात काय याचा थांगपत्ता लागू दिला नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारांमध्ये तीव्र नाराजीचे कल्पना देण्यात आली. त्यानंतर गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी निवडणुकीत आपले डाव टाकण्यास सुरुवात केली. मतदानाच्या दोन दिवस आधी रात्रभर प्रत्येक मतदाराच्या घरी गीते यांचा खास संदेश पोहोचला.
त्यात शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दराडे यांना सावध करूनही उपयोग झाला नाही. निवडणुकीत महायुतीकडे ४६६ असे भरभक्कम मतदान होते. विरोधकांकडे अवघे १५६ मध्ये होती. विरोधकांची ही मते देखील विविध नेत्यांमध्ये विभागणी होती. विरोधकांबरोबरच महायुतीतील देखील विविध नेत्यांनी गीते यांना मनापासून मदत केली, हे लपून राहिलेले नाही.
निवडणुकीचा निकाल काय लागणार याविषयी सध्या विजयाची शंभर टक्के खात्री असलेल्या महायुतीच्या नेत्यांसाठीही जाणीवपूर्वक शासऺकता निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षातील नाराज नेत्यांनी निवडणुकीत नेमके काय केले? याचा निकाल आज मतमोजणीतून स्पष्ट झाला आहे. हमखास विजयाची खात्री असलेले नरेंद्र दराडे किती मतांनी विजयी होतात हा ओव्हर कॉन्फिडंट मागे पडला. गोकुळ गीते यांची स्ट्रॅटेजी यशस्वी झाली. यावर आगामी राजकारण प्रभावित होणार आहे. नाशिकचा निकाल धक्कादायक लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.