Anandrao Pawar News, Eknath Shinde News, Sangli News
Anandrao Pawar News, Eknath Shinde News, Sangli News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत शिवसेनेला खिंडार; जिल्हाप्रमुख आनंद पवारांची एकनाथ शिंदेंना साथ!

सरकारनामा ब्यूरो

सांगली : सांगलीत (Sangli) शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) आनंदराव पवार यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात जाणार असल्याचे स्वतः आनंदराव पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सांगलीत शिवसेनेला खिंडार पडले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी याच आनंदराव पवार यांना त्रास दिल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर नाव घेऊन केला होता. त्यामुळे पवारांनी शिंदेंच्या प्रेमाची परतफेड केली आहे. (Sangli Shiv Sena district chief Anandrao Pawar joins Shinde group)

शिवसेनेचे सांगलीचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी आपण पदाचा राजीनामा देत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार यांनी मुंबई गाठत एकनाथ शिंदे यांची भेट घेत ही घोषणा केली आहे.(Sangli Latest Marathi News)

पवार म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. कायम कट्टरच राहणार. परंतु, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय व निर्धार पवारांनी केला आहे.. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊनशिवसैनिकांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीत असूनही शिवसैनिकांवर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचंड अन्याय झाला. आम्हाला महाविकास आघाडीची अभद्र युती मान्य नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंना आम्ही पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

विधानसभेत काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

जयंत पाटील, तुम्ही इस्लामपूरच्या आमच्या शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार याला नाहक त्रास दिला. त्याच्या भावाला तडीपार केलं, सहकाऱ्यांवर मोक्का लावला, त्यांना जेलमध्ये घातले. आनंदराव माझ्याकडे येऊन ओक्साबोक्शी रडला.तुम्ही एकटेच आमचे ऐकून घेता म्हणाला. त्या सत्तेतून शिवसैनिकाला काय मिळाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मला समजल्यानंतर ते मी वरिष्ठांना सांगितले. डीजी म्हणाले, ‘तो असा आहे, तसा आहे.’ मी असतो तर सांगितले असते, तो निर्दोष आहे, त्याच्यावर कारवाई करू नका, फाईल बंद करा आणि मला रिपोर्ट करा. पण, जयंतराव तुमचे लोक आनंदरावच्या कुटुंबाकडे गेले, तू राष्ट्रवादीत ये, तुझ्या भावाविरोधातील सुनावणी घेतो आणि त्याला निर्दोष करतो, असं म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT