Shiv Sena : मंत्रिपद मिळाल्यानंतर भूमरेंनी राऊतांसमोर लोटांगण घातलं होतं!

भूमरे यांनी राऊतांवर सडकून टीका केली जात आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut News, MLA Sandipan Bhumre News
Shiv Sena MP Sanjay Raut News, MLA Sandipan Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील (Shiv Sena) बाहेर पडलेल्या बहुतेक आमदार खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहेत. राऊतांमुळे शिवसेना संपत चालल्याचा दावा या आमदारांकडून केला जात आहे. आमदार संदीपान भूमरेही त्यात आघाडीवर आहेत. पण राऊतांनी भूमरे यांच्यावर पलटवार करत गौप्यस्फोट केला आहे. भूमरे यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर आपल्यासमोर लोटांगण घातल्याचा दावा राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

बंडखोर आमदारांकडून राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्याला राऊतांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. भूमरे यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, संदीपान भूमरे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यालयात येऊन त्यांनी माझ्यासमोर प्रेमानं लोटांगण घातलं होतं. साहेब, तुम्ही होतात म्हणून सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, असं त्यावेळी भूमरे म्हणाल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut News, MLA Sandipan Bhumre News
मातोश्रीवर सर्वांना सोबत घेऊन जाईन! राठोडांनंतर सुहास कांदेचीही तयारी

भूमरे यांनी लोटांगण घातल्याचे व्हिडीओ फुटेज असेल तर काढायला लावतो. आज तेच भूमरे उद्धव ठाकरेंवर आगपाखड करतात, असं राऊत म्हणाले. संजय राठोडांवरच्या संकटामध्ये उद्धव ठाकरे त्यांच्यामागे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. आमचं मन स्वच्छ आहे. कुणालाही काही बोलू देत, असंही राऊत यांनी सांगितले.

आमदारांनी मुंबईतून पलायन केले तेव्हा ते म्हणत होते, की हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्यादिवशी सांगितलं की, राष्ट्रवादीकडून निधी मिळत नव्हता. तिसऱ्यावेळी सांगितलं, काही लोकं आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते. आणि चौथ्यावेळी ते माझं कारण देत आहेत. आपण नेमके बाहेर का पडले, याची कार्यशाळा घ्यायला हवी. त्यांनी गोंधळून जाऊ नये. लोकांना संभ्रमात टाकू नये, अशी टीकाही राऊतांनी केली.

Shiv Sena MP Sanjay Raut News, MLA Sandipan Bhumre News
जितेंद्र नवलानीला शिंदे सरकारकडून क्लिन चिट; खंडणी प्रकरणाची चौकशी पोलिसांनी गुंडाळली

शरद पवारांमुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे, असं सांगितले जात आहे. पण अर्धे लोकं तर तिकडूनच शिवसेनेत आले आहेत. त्यांचं नेतृत्वच मानणाने लोकं होते. शिवसेना मजबूत आणि खंबीर आहे. चाळीस लोकं गेल्यामुळे शिवसेनेचा एक कपचा सुध्दा उडालेला नाही. शिवसेना जमिनीवर आहे. भविष्यात निवडणुकांमध्ये मतदार शिवसेनेमागे ठामपणे उभे असल्याचे आम्ही दाखवून देऊ. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजपचे नेते पवारांचं कौतुक करतात. देशातील अनेक नेते त्यांच्या कामाचं कौतुक करतात. महाराष्ट्रातील नेत्यांचं कौतुक करायचे, नाही तर काय करायचे, असा टोलाही राऊतांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com