एकनाथ शिंदेंच्या घरात, मुख्यमंत्री दालनात अद्यापही ठाकरेंचेच फोटो

मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची भव्य प्रतिमा लावण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमाही या दालनात आहे.
Eknath Shinde News in Marathi, Shivsena News
Eknath Shinde News in Marathi, Shivsena Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मंत्र्यालयात पदभार स्वीकारला. त्यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भव्य प्रतिमा लावण्यात आली आहे. त्यांच्या घरी अद्यापही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत.(Eknath Shinde News in Marathi)

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेना नेते आणि शिंदे यांच्यात कटूता निर्माण झाली आहे. पण 'मी शिवसैनिकच आहे,' असे सांगत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे परिवाराबाबत आपल्या मनात आदर असल्याचे यातून दाखवून दिले आहे. (Shivsena Latest Marathi News)

Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama

पंढरपूर येथील मंदिराचे पदाधिकारी आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या पूजेचे निमंत्रण देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले तेव्हा तेथे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीने पक्षप्रमूख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असल्याचे दिसून आले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शिवसेनत बंड केल्यानंतर "मी शिवसेनेत आहे," असे सांगणाऱ्या शिंदेंच्या घरी अजूनही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची भव्य प्रतिमा लावण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमाही या दालनात आहे.

Eknath Shinde News in Marathi, Shivsena News
ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार : ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात

राजकीय घडामोडींची सुरुवात होण्यापूर्वी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 10 जुलै रोजी आषाढीला महापूजेसाठी येण्याचे निमंत्रण मुंबईत जाऊन 13 जून रोजी दिले होते. मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्यांनी ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला.

शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पुन्हा मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण त्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com