Koyana Dam .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam : मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर वेगाने सूत्रे फिरली; कोयनेतून सांगलीला दोन 'टीएमसी' पाणी !

Sangli water issue: आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्याला यश... 

सरकारनामा ब्यूरो

विशाल पाटील-

Sangli News : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीपात्रात पाण्याची चणचण भासू लागली असून, शेती तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. परंतु, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाणी सोडण्याचे आदेश दिले जात नसल्याचा आरोप होत होता. त्यानंतर या प्रश्नावर शुक्रवारी शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सांगलीतील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्यानंतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशावरून सांगली जिल्ह्यासाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर कोयनेतून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अनिल बाबर यांच्याकडून गेले 5-6 दिवस कोयनेतून पाणी सोडावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्याबाबत त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणं सुरू होते. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तातडीने सांगलीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पाण्याचे सर्व नियोजन साताऱ्याचे जिल्हाधिकारी करणार आहेत.

शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची आडमुठी भूमिका, पालकमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या काही बातम्या वाचायला मिळाल्या. आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत, सर्वांचा विचार करून भूमिका घ्यावी लागत आहे. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना धरण 105 टीएमसी असून दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरत असते. परंतु, चालू वर्षी 27 ते 30 टीएमसी पाणीसाठा धरणात कमी आहे. त्यामुळे जुलै 2024 पर्यंत सध्या असलेले पाणी पुरवायचे आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची आडमुठी भूमिका, पालकमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या काही बातम्या वाचायला मिळाल्या. आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत, सर्वांचा विचार करून भूमिका घ्यावी लागत आहे. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना धरण 105 टीएमसी असून, दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरत असते. परंतु, चालू वर्षी 27 ते 30 टीएमसी पाणीसाठा धरणात कमी आहे. त्यामुळे जुलै 2024 पर्यंत सध्या असलेले पाणी पुरवायचे आहे.

पॉवर जनरेशनसाठीचे पाणी शेतीला  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून कोयना धरणात जे पाणी पाॅवर जनरेशसाठी राखीव ठेवले आहे ते कमी करून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वळवण्याचा निर्णय झाला तर पाॅवर जनरेशच पाणी कमी केल्याने वीज कमी तयार होणार आहे. त्यामुळे मार्केटमधून वीज खरेदी करावी लागली तर त्यांना निधी खर्च करावा, यासाठी चर्चा करणार आहोत. शेवटी लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळावे, अशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

जनतेला आवाहन

राज्यातील तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील विशेष करून जनतेला आवाहन करतो. पाण्याची कमतरता असून, आपण काटकसरीने वापर करीत आहोत. पाण्याचे नियोजन केले असून पहिले प्राधान्य पिण्यासाठी, नंतर शेतीला आणि शेवटी औद्योगिक वापराला दिले आहे. जो उपलब्ध कोयना धरणातील साठा पुढचा पाऊस पडेपर्यंत टिकला पाहिजे असे नियोजन असल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संगितले.

(Edited By Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT