Jayant Patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP President : 'राष्ट्रवादी'च्या भूमिकेने सांगली जिल्हा परिषदेचे गणित फिरणार! जयंत पाटलांची धाकधूक वाढली

Jayant Patil vs BJP : सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेच्या चाव्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हाती आहेत. त्यातच आघाडी की महायुतीला पाठींबा द्यायचा हे पक्षाचे ठरले नसल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Roshan More

NCP Politics : सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमका कोणाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट होऊ शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मित्रपक्षांच्यासोबत सत्तेच्या जवळ आहे. त्यांच्याकडे 30 सदस्य होत आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वगळून भाजप आणि मित्र पक्ष मिळून 25 सदस्य होत आहे. त्यामुळे सहा सदस्य असलेल्या अजितदादांची 'राष्ट्रवादी' सत्ता कोणाची हे ठरवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर न केल्याने जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची सत्ता स्थापनेत मोठा कस लागणार आहे. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील विरुद्ध भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात कोण बाजी मारणार याची देखील उत्सुकता जिल्ह्यात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वाधिक 18 सदस्य आहेत. त्यांनी आपली गट नोंदणी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा सदस्य आहेत. त्यांनी अजून गट नोंदणी केलेली नाही. त्यांचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट करतान सांगितले आहे की, आमचा गट अजून स्थापन झालेला नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला अजून विलंब आहे. कोणाला पाठींबा द्यायचा याजा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत.

पाठींब्यासाठी चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, अजितदादांच्या निधनाने या चर्चांना ब्रेक लागला आहे. त्यातच सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजितदादांच्या राष्ट्रवादीची पाठींब्याची गरज लागणार आहे. त्यामुळे जयंत पाटलांकडून चाचपणी करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT