

संजय भोईर
Congress News : भिवंडी महापालिका महापौर पद निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दोन गट पडल्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे.
या संदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.शहराध्यक्षांच्या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचे बोलले जात आहे.
९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेस ३० व राष्ट्रवादी काणग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १२ असे ४२ चे संख्याबळ असून महापौर पदासाठी केवळ चार सदस्यांची आवश्यकता आहे.मात्र याबाबतच्या वाटाघाटी करण्याच्या कोणत्याही सूचना मला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिल्या नाहीत, असा दावा देखील मोमीन यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकी आधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर यांनी केला. या विषयी त्यांनी राहुल गांधी पत्र लिहून तक्रार केली आहे.
भिवंडी महापौर पदासाठी आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये फूट पडल्याने काँग्रेसला फायदा होईल, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपने देखील फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.