chandrakant patil jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP Result : जयंत पाटलांकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम; बहुमत जुळवताना चंद्रकांतदादांची होणार दमछाक; मविआ सत्तेत?

Sangli ZP Result jayant Patil : सांगली जिल्हा परिषदेतील 61 पैकी 59 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्तेच्या चाव्य त्यांच्यात हातात राहणार असल्याची शक्यता आहे.

Rahul Gadkar

Sangli ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. सातारा, कोल्हापूर, या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांवर भाजपची सत्ता येणार हे निश्चित झाले असताना जयंत पाटलांनी भाजपचा सांगली जिल्हा परिषदेमध्ये टप्प्यात कार्यक्रम केला आहे.

सुसाट निघालेल्या भाजपला सांगलीत ब्रेक लागला. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 61 जागा आहेत. तेथे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने जोरदार फाईट देत या निवडणुकीत रंगत वाढवली आहे.

सांगली जिल्हा परिषदेतील 61 पैकी 61 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, काँग्रेसचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र आली तर त्यांची संख्या 30 होते.

भाजप 16 जागांवर विजयी झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा आणि शिंदेच्या शिवसेनेला 6 तर जनसुराज्यला 1 आणि रयत क्रांतीला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे महायुती एकत्र आली तर त्यांचे संख्याबळ देखील 31 होते. त्यामुळे महायुती एकत्र आली तर सत्तास्थापन होऊ शकते. मात्र, काढावरचे बहुमत असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या शरद राष्ट्रवादीला साथ दिली तर चित्र पालटू शकते, अशी चर्चा आहे. कारण या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते.

मित्र पक्षांच्या मागण्या वाढणार

भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटे की टक्कर सुरू होती.महायुती म्हणून भाजपकडे काढावरचे बहुमत आहे. त्यामुळे मित्रपक्षांचे महत्व वाढले आहे. त्यामुळे त्याच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदचे अध्यक्षपदावर दावा मित्रपक्षांकडून सांगितला जाणार नसला तर त्या बदल्यात बांधकाम सभापतीपदासारखे मोठ्या पदाचा आग्रह धरला जाऊ शकतो.

चंद्रकांत पाटलांची कसोटी

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतिम निकालात जागांचे अंतर अगदीच कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्र पक्षांच्या मागण्या मान्य करून सत्ता स्थापन करण्यासाठी चंद्रकांत पाटलांची कसोटी लागणार असल्याची चर्चा आहे.

61 पैकी 59 जागांचे निकाल

भाजपा - 16

राष्ट्रवादी अजित पवार - 05

शिंदेसेना - 07

काँग्रेस - 11

राष्ट्रवादी शरद पवार - 17

शिवसेना ठाकरे पक्ष - 01

रयत क्रांती संघटना - 01

जनसुराज्य शक्ती पक्ष - 01

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT