Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीमध्ये सराफाला मारहान करून लूटमार करण्यात आली होती. याची सराफ व्यापारी कोडग यांनी फिर्याद दिली होती. तर फिर्यादीनुसार, रोकड, मोबाईल आणि सोन्याची अंगठी असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचे त्यांनी म्हटलं होतं. पण पोलिसींनी 24 तासात छडा लावलेल्या या प्रकरणात वेगळीच बाब समोर आल्याने तपास करणारे पोलिसही चक्रावले आहेत. तपासात 3 लाख रुपयांच्या मुद्देमालाची फिर्याद देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात 2.5 कोटी रोकड पोलिसांच्या हाती लागली आहे. फिर्यादेतील रक्कम आणि जप्त केलेले रक्कम यात तफावत असल्याने आता याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगलीतील जत तालुक्यातील उमदी येथील अनिल अशोक कोडग हे सराफ (Gold) व्यावसायिक आहेत. ते कर्नाटकातील विजयपूरकडे निघाले असता त्यांची गाडी 7 संशयतांनी आडवली. तसेच त्यांना रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करत लूटमार केली. यावेळी त्यांनी याबाबत फिर्याद देताना चोरट्यांनी रोकड, मोबाईल आणि सोन्याची अंगठी असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचे म्हटले होते. पण प्रत्यक्षात 2.5 कोटी रोकड पोलिसांच्या हाती लागल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
त्याप्रमाणे सांगली पोलिसांनी जबरी चोरीचा तपास करताना 24 तासात चोरांचा छडा लावला आणि 3 तिघांजणांना ताब्यात घेतलं. यावेळी सांगली पोलिसांनी जप्त केलेली रक्कम तब्बल अडीच कोटी रुपयांची निघाली. यामुळे आता वेगळा संशय येत असून पोलिसांनी याचा तपास आयकर विभागाकडून देखील करण्यास सुरूवात केली आहे.
कोडग यांनी लूटमारीची फिर्याद उमदी पोलीस ठाण्यात दिली होती. या जबरी चोरीची माहिती मिळताच सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि उमदी येथे 7 जणांनी जबरी चोरी केल्याचे समोर आले.
यानंतर पथकाने उमदीमधील रवी तुकाराम सनदी आणि कर्नाटकातील विजयपूर येथील अजय तुकाराम सनदी व चेतन लक्ष्मण पवार यांना आधी ताब्यात घेतले. यावेळी कसून चौकशी केली असताना त्यांनी अन्य 4 जनांच्या मदतीने लुटमार केल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी लालासाहेब हजरत होनवाड, आदिलशहा राज अहमद अत्तार, सुमित सिद्राम माने आणि साई सिद्धू जाधव यांना अटक केली असून तर चौघांचा शोध पोलिस घेत आहेत.
या लुटमारीत अटक करण्यात आलेल्या संशितांपैकी एक सराफ व्यापारी कोडग यांच्या कारवर ड्रायव्हरचा मुलगा असल्याचे उघड झाले आहे. साई जाधव हा कारवर ड्रायव्हरचा मुलगा आहे. साई जाधव हा अन्य सहा संशयितांना कोडग यांचे लाईव्ह लोकेशन पाठवत असल्याचेही आता समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यासर्वांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या संशयितांकडे इतकी मोठी रक्कम कोठून आणली? फक्त 3 लाखांच्या लुटीची फिर्याद का देण्यात आली? यासह अनेक प्रश्नांचा आता उलगडा होण्यास मदत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.