Sangli Congress : नवी रणनीती, कृती आराखडे आणि गावपातळीवरील बांधणीचा काँग्रेसचा निर्धार

Vikramsinh Sawant On Sangli Congress : नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश आले होते. यामुळे अनेक नेते सत्तेच्यास मार्गावर सूसाट निघाले असून पक्ष सोडत आहेत.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : काहीच महिन्यांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीला यश प्राप्त करताना आले नाही. एके काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मोठी पिच्छेहाट झाली आहे. काँग्रेसला राज्यभरात फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला होता. तर सांगलीत फक्त एकच जागा राखता आली. तर इतर ठिकाणी चुकीच्या निर्णयाचा काँग्रेसचा फटका बसला होता. पण आता आगामी काळात पुन्हा काँग्रेस बळकटी देण्यासाठी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी केली जाणार असून माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संघटनात्मक बळकटीसाठी जोर लावला आहे.

गत निवडणुकांमधील अनुभव व झालेल्या चुका यांचा सारासार अभ्यास करून, त्यात सुधारणा करा आणि जत तालुक्यात नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने काम करून पुन्हा काँग्रेस बळकट करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत जत येथील बैठकीत केलं आहे. त्यांनी हे आव्हान कार्यकर्त्यांशी साधताना करत असताना, नवी रणनीती, कृती आराखडे आणि गावपातळीवरील बांधणी अशी त्रिसुत्री सांगितली आहे.

जत येथे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी बैठकीस तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सभापती सुजय शिंदे, अजित ढाले, मल्लेश कत्ती, युवराज निकम, अण्णासाहेब सावंत यांच्यासह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Congress
Congress Adhiveshan 2025 : काँग्रेसचे गुजरातमधील अधिवेशन आहे खास, ऐतिहासिक कारण माहीत आहे का?

यावेळी सावंत म्हणाले, ‘‘केंद्रातील व राज्यातील निष्क्रिय भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आता पेटून उठला आहे. जनतेच्या हिताविरोधी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता भक्कमपणे विरोध करणार आहे. शिवाय, सध्याचे भाजप सरकार जाती-धर्मांमध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना पाठिंबा देत असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजविरोधी घटकांना पाठीशी घालत आहे. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून देशाच्या ऐक्याला व लोकशाहीला घातक असल्याचेही सावंत यांनी सांगितलं आहे.

Congress
BJP Vs Congress News : काँग्रेसला भाजपकडून धक्का; मलकापूरचे चांदे काका- पुतणे BJPमध्ये दाखल!

‘नव्या संकल्पांची सुरुवात’

यावेळी काँग्रेस पक्ष अशा प्रवृत्तींविरोधात ठामपणे उभा असून सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्यांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे. ही बैठक म्हणजे केवळ संवाद नव्हे, तर नव्या ऊर्जा, संकल्पांची सुरुवात होती. तालुकास्तरावरून उभारलेला हा जनआंदोलनाचा पाया भविष्यातील राजकीय लढ्याचे भक्कम अधिष्ठान ठरेल,’’ असा विश्वास माजी आ. सावंत यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com