Shahajibapu Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : 'धनुष्यबाणाचे बटन दाबलेले स्वर्गात जाणार, दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे...' सांगोल्यातील विजयी सभेतून शहाजीबापूंनी विरोधकांचा हिशेब चुकता केला

Shahaji Bapu Patil On BJP : 'मी भाकरीत साप पाळला होता म्हणूनच मला विधानसभेला पराभवाचा फटका बसला, असं के म्हणाले. तर आपण आजही महायुतीत आहे. आपल्याला युतीचेच काम करायचे आहे. मात्र हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवा आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही.'

Jagdish Patil

Solapur News, 28 Dec : राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांचा पराभव केला. शिवाय या निवडणुकीत भाजपनेच त्यांना दगा दिल्याचा आरोप पाटील यांनी केला होता.

दरम्यान, आता निकालानंतरच्या विजयी सभेत बोलताना शहाजीबापू पाटील यांनी सर्वांचा हिशेब चुकता केला. तर त्यांच्या विरोधात काम केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर तर जहरी टीका केली. दीपक साळुंखे स्वतःला किंग मेकर म्हणतात मी जिथे जाईल त्याचा गुलाल असतो असं ते सांगतात.

मात्र ते पांढऱ्या पायाचे असल्यामुळे ते ज्यांच्याकडे जातील त्यांचा पराभव नक्की होतो, अशा शब्दात त्यांनी साळुंखेवर टीका केली. तसंच आपल्या नेहमीच्या शैलीत शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी देखील या विजयी सभेत बोलताना केली. यावेळी ते म्हणाले, या निवडणुकीत धनुष्यबाणाचे बटन दाबलेले सगळे नक्कीच स्वर्गात जाणार.

देव तुम्हाला नरकात जाऊच देत नसतो. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणं दाबली त्यांचं काय खरं नाही त्यांच्यात रामच उरला नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी विधानसभेतल्या पराभवावरून देखील दीपक साळुंखेंवर टीका केली. मी भाकरीत साप पाळला होता म्हणूनच मला विधानसभेला पराभवाचा फटका बसला, असं के म्हणाले. तर आपण आजही महायुतीत आहे. आपल्याला युतीचेच काम करायचे आहे.

मात्र हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवा आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही. पण तुम्ही तसं केलं नाहीतर तर आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला. शिवाय तुम्ही आताच्या निवडणुकीत ऐकलं असतं तर तुम्ही सत्तेत निम्मे भागीदार झाला असता.

भाजपचे कमळ हे आमच्या उमेदवाराच्या हातात देखील शोभले असते असंही शहाजीबापू या सभेत म्हणाले. त्यामुळे त्यांनी भाजपला विरोधात लढण्याची भूमिका घेणं त्यांच्यासाठी कसं नुकसानकारक ठरलं हेच दाखवून देण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT