Dadaji Bhuse, Eknatha Shinde , sanjay raut sanjay shirsat sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Raut : मुजरा, लफंगे, पळपुटे, गुलाम; संजय राऊतांची तोफ धडाडली

Political News : ठाकरे गट डोबाऱ्याचा खेळ करत असल्याच्या संजय शिरसाटांच्या टीकेलाही खासदार राऊतांनी प्रत्युत्तर दिले

Vishal Patil

Karad : शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्या निशाणावर शिंदे गटातील दादा भुसे, संजय शिरसाठ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. कऱ्हाडमध्ये आलेल्या संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर दिल्लीत दीड वर्ष मुजरा करण्यात वेळ गेला,अशी टीका केली.तसेच लफंगे, पळपुटे, गुलाम म्हणून उल्लेख करत शिंदे गटावर तोफ डागली.

कराड येथे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. साताऱ्यात आज (दि. 14) छत्रपती उदयनराजे यांच्या नेतृत्वात मेळावा होत आहे. यावरही संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, छत्रपती महायुतीचे नेते आहेत. ज्या पक्षात आहेत. त्या पक्षाचे इमान त्यांनी राखले पाहिजे. तर ठाकरे गट डोबाऱ्याचा खेळ करत असल्याच्या संजय शिरसाठांच्या (sanjay shirsat) टीकेलाही खासदार राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही गावोगावी जावून डोबाऱ्यांचाच खेळ करणार आहोत. डोबाऱ्यांकडे जो हंटर असतो. त्याने लोक शिंदे गटातील नेत्यांना फोडून काढणार. 

कोण दादा भुसे? 

मंत्री दादा भुसे यांनी काही लोक रोज सकाळी 8-9 ला उठले की टिव्हीसमोर येणार वाकडी मान करणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार, अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही? अशा शब्दात संजय राऊतावर टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोण दादा भुसे? तुमची मान वाकडी होण्याची वेळ आली. आम्ही ताठ मानेची लोक आहोत. शिवसेना ताठ मानेनं जगणारी संघटना आहे. शिवसेना तुमच्यासारख्या लफग्यांची टोळी नाही. तुम्ही सगळे पळपुटे आहात. त्यांना माझी भीती वाटते अन् वाटायलाच पाहिजे. 2024 साल सुरू झाले असून सत्य लवकरच कळेल आणि यामधील एकही आमदार विधानसभेत दिसणार नाही, हे लिहून ठेवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री दिल्लीचा गुलाम

मुख्यमंत्र्याला काय गांभीर्याने घेता. मुख्यमंत्री दिल्लीचा गुलाम माणूस आहे. दीड वर्ष दिल्लीत मुजरे घालण्यात गेला. महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसांचा अभिमान, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण, आचरण काय आहे का त्याच्याकडे. सत्तेसाठी हपापलेली , डरफोक, ईडीला घाबरून पळालेली लोक आहेत ती. आम्ही लढू आणि त्यांना गाडू, असे ठणकावून ठाकरे यांनी सांगितले.

(Edited Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT