Sharad Pawar, Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: पूर्वी आमच्या वाड्यात तुताऱ्या वाजायच्या..., चिन्हावरून उदयनराजेंनी पवारांना ललकारलं

Udayanraje Bhosale News: "माझी पक्षापेक्षा तत्त्वावर निष्ठा आहे. बारकाईने विचार केला तर अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं. पण, त्यांचे विचार जास्तीत जास्त भाजपने आचरणात आणले आहेत."

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale On sharad Pawar: खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारीवरून खासदार शरद पवार Sharad Pawar यांना डिवचलं आहे. उदयनराजे म्हणाले, तुतारी म्हणजे काय, आज कोणी तरी चिन्ह घेतलं आहे. पूर्वीच्या काळात आमच्या वाड्यात तुताऱ्या वाजायच्या. कुठंही लग्नाला गेलं तरी तुतारी असतेच, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

उदयनराजेंनी Udayanraje Bhosale सातव्या दिवशीही लोकसभा निवडणुकीसाठी आपली संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे. या वेळी पत्रकारांनी त्यांना पुन्हा एकदा तिकिटाच्या विषयावरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, सारखं सारखं तिकिटाचा विषय कशाला काढता, मला तुम्हा पत्रकारांची शंका येते. मला तिकीट लावून लांब कुठं तरी कुरिअर करण्याचं तुमच्या डोक्यात दिसतंय, पण तसा मी एवढा सोपा नाही, तिकिटाचा विषयही होऊन जाईल, असं उदयनराजे म्हणाले.

सातारा Satara जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या. या जिल्ह्याने देश आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाचा गनिमी कावा असतो. शेवटी साताऱ्यावर बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात. साताऱ्याची ही आगळीवेगळी ओळख आहे, असे सूचक वक्तव्य उदयनराजेंनी या वेळी केलं.

पक्षापेक्षा तत्त्वावर निष्ठा

दरम्यान, तुमची तुतारीसंदर्भात शरद पवारांशी Sharad Pawar काही चर्चा झाली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, "माझी पक्षापेक्षा तत्त्वावर निष्ठा आहे. बारकाईने विचार केला तर अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं. पण, त्यांचे विचार जास्तीत जास्त भाजपने BJP आचरणात आणले आहेत. तुतारी म्हणजे काय? आज कोणीतरी हे चिन्ह घेतलं आहे. पूर्वीच्या काळात आमच्या वाड्यात तुताऱ्या असायच्या. कुठंही लग्नाला गेलं तर तुतारी असतेच. त्यामुळे चिन्ह चांगलं आहे. हे जरी खरं असलं तरी मला दुसऱ्या पक्षावर भाष्य करायचे नाही."

तसेच प्रत्येक ठिकाणी भाजपची वाटचाल यशाच्या दृष्टीने दिसते. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून होते. त्यामुळेच लोकांचा विश्वास आमच्या पक्षावर निर्माण झाला आहे. पूर्वीच्या काळात त्यांनी सर्वसामान्यांना न्याय दिला असता तर त्यांचाही पक्ष मोठा झाला असता, असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला. दरम्यान, साताऱ्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज भाजपचा स्थापना दिवस उदयनराजेंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी भाजप पक्षाचा ध्वज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फडकवण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT