Lok Sabha Election: वाद चिघळला! सांगली काँग्रेसचीच हे जनावरालाही...; कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर

Sangli Lok Sabha Election 2024: एकीकडे सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने पहिल्यापासून दावा केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने इथे परस्पर उमेदवार जाहीर केला आहे.
Vishwajeet Kadam, Sanjay Raut
Vishwajeet Kadam, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Vishwajeet Kadam News: लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, तरीही अद्याप राज्यातील महाविकास आघाडीमधील MVA जागावाटपांचा तिढा सुटलेला नाही. एकीकडे सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने Congress पहिल्यापासून दावा केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने इथे परस्पर उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे सध्या या जागेवरून आघाडीत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

सांगलीच्या Sangli जागेसाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम Vishwajeet Kadam आग्रही आहेत, तर शिवसेना नेते संजय राऊत हे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार Chandrahar Patil पाटलांच्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे आघाडीतील हा तिढा कधी सुटणार आणि ही जागा नेमकी कोणाला मिळणार? याबाबत कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये संभ्रम आहे. अशातच आता विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे हे जनावरालाही माहिती असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी विशाल पाटील यांचे विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये; असं म्हणत विश्वजित कदम अन् सांगली लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार विशाल पाटील Vishal Patil यांना टोला लगावला. राऊतांच्या याच वक्तव्यावर प्रश्न विचारला असता विश्वजित कदम म्हणाले, "सांगलीची जागा परंपरेने काँग्रेसची आहे. या जिल्ह्यात आमचं संघटन चांगलं आहे. तसेच इथून लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहिती आहे, असा कोणताही व्यक्ती किंवा एखाद्या जनावरालाही विचारला तरी तो सांगेल की, हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. जनावरांचा यासाठी म्हटलं की, सांगलीत खूप शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जास्त जनावरं आहेत, म्हणून मी असं बोललो."

Vishwajeet Kadam, Sanjay Raut
Loksabha Election 2024 : सातारच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम; कराड, पाटणचे नेते मुंबईत तळ ठोकून

ते म्हणाले, संजय राऊत कोणत्या अर्थाने काय बोलतात यावर मी सध्या टिप्पणी करणार नाही. परंतु ते म्हणताहेत तसं लोकांना बदल हवा आहे, हे बरोबर आहे. कारण 2014 आणि 2019 ला इथून भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. शिवाय काँग्रेस (Congress) सांगली जिल्ह्यात घराघरापर्यंत पोहोचलं आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सक्षम उमेदवार दिला आहे. तसेच आम्ही ही निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक असल्याचंही कदम म्हणाले. कदमांच्या या वक्तव्यामुळे आता सांगलीची जागा महाविकास आघाडीकडून अधिकृतरित्या काँग्रेसला मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Vishwajeet Kadam, Sanjay Raut
MP Sanjay Raut News : आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय; राऊत कडाडले !

सुरुवातीपासून आमची एकच भूमिका

कदम म्हणाले, सुरुवातीपासून आमची एकच भूमिका आहे, आघाडीतील तिघांना एकमेकांची गरज आहे. परंतु, याचा अर्थ कोणी कुणाला कमी लेखू नये. सांगलीच्या जागेबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole जी भूमिका व्यक्त केली ती इथल्या कार्यकर्त्यांचे ऐकूनच व्यक्त केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आदेश देतील त्या निर्णयाचं आम्ही पालन करू, असंही कदमांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विशाल पाटील यांनी संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर असतानाच एक पत्र कार्यकर्त्यांसाठी लिहिलं आहे. ज्यामध्ये पत्र लिहित त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता सांगलीची आगाडीकडून अधिकृतरित्या कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com