Sharad Pawar, Tutari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Lok Sabha Election: मोठी घडामोड! सातारा लोकसभेचा आजच फैसला? पवारांनी मुंबईहून पाठवले हेलिकाॅप्टर अन्...

NCP Sharad Pawar News : सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार द्यावा, यासाठी आज मुंबईत मोठी खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गट अन् शरदचंद्र पवार गटाच्या बैठका सुरू असून, उमेदवार आज ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vishal Patil

Satara News : लोकसभा निवडणुकीत उमेदवार नक्की कोण ठरवायचा, यासाठी आता मोठ्या घडामोडी होऊ लागल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. साताऱ्यातून नक्की कोणी निवडणूक लढायची, याबाबत अद्याप पवारांच्या गटात उमेदवार नाही.

सातारा शहरातील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर चक्क स्वतः शरद पवारांनी सातारला हेलिकाॅप्टर पाठवत इच्छुकांसह आमदार बाळासाहेब पाटलांना मुंबईला बोलावले आहे. या हेलिकाॅप्टरमधून राष्ट्रवादीचे बडे चार नेते मुंबईला रवाना झाले असून, आजच साताऱ्याचा फैसला होईल, असे सांगितले जात आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार द्यावा, यासाठी आज मुंबईत मोठी खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गट अन् शरदचंद्र पवार गटाच्या बैठका सुरू असून, उमेदवार आज ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अचानक मुंबईतून साताऱ्याला शरद पवार(Sharad Pawar) यांनी हेलिकाॅप्टर पाठवून चर्चेत असलेले उमेदवार विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील यांना बोलावले आहे.

साताऱ्याची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी लढणार असल्याने या चाैघांच्या उपस्थितीत उमेदवार फायनल होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातील उमेदवार ठरविण्यासाठी मोठ्या घडामोडी घडू लागल्या असून, नक्की कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार पुढील काही काळातच समोर येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आमदार बाळासाहेब पाटील यांचा विचार गृहीत धरला जाणार आहे. तसेच लोकसभा मतदारसंघातून नवा चेहरा की पुन्हा खासदार श्रीनिवास पाटलांनी (Shriniwas Patil) संधी याबाबत चर्चा होणार हेही निश्चित आहे. परंतु, बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी पक्षाबाहेरील उमेदवारांचा विचारही होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाराजीनंतर पहिल्यांदाच एकत्रित प्रवास... 

सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाटण, उंब्रज या ठिकाणी कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विजय निश्चित मेळावे घेण्यात आले.

या मेळाव्यातील बॅंनरवर विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातील दुफळी समोर आली होती. गटातील नाराजी दूर करण्यासाठी आणि एकमताने उमेदवार ठरविण्यासाठी मुंबईतील बैठकीला चाैघेही नेते एकाच हेलिकाॅप्टरमधून रवाना झाले आहेत.

चाैघांपैकी कोणाचं तिकीट फायनल? 

सातारा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, खासदार पुत्र सारंग पाटील की सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांचे नाव निश्चित होणार, याकडे आता सातारकरांचे लक्ष लागून आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सत्यजित पाटणकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी विचारणा झाल्याचे विचारले असता, त्यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT