Mumbai News : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आरोप-प्रत्यारोपांमुळे नेतेमंडळीत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातच एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केलेल्या आरोपामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही गट मिळून काँग्रेसला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला एकटे पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पुढे जाऊन ते आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करीत असलेल्या वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही धोका देणार असल्याचा आरोप भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
(Lok Sabha Election 2024 News|)
उद्धव ठाकरे हे दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत यांच्या आई-वडिलांना भेटणार आहेत का ? गुलाबराव पाटीलबरोबर ते बरोबर आहेत. भाजप तडीपार होणार नाही, तर येत्या काळात आदित्य ठाकरे तडीपार होणार आहेत. त्यामुळे सध्या ते आईला घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत. श्रीधर पाटणकर यांच्याकडे 10 हजार कोटी रुपये कसे आले? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे-पाटील यांना मराठा समाज गांभीर्याने घेत नाही. जरांगे समाजाबद्दल कमी पण राजकारण जास्त करत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. मराठा समाजाला न्याय देवेंद्र फडणवीस यांनीच दिला आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी बोलले की दिवसभर चर्चेत राहायला मिळते. हे संजय राऊत (Sanjay Raut) यांना माहीत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याची त्यांची सवय झाली आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच घर सांभाळता आले नाही, ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत पंतप्रधान मोदींजींना सल्ले देत आहेत.
R