Amit Shaha, Supriya Sule, Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Lok Sabha Election: उदयनराजेंना ताटकळत ठेवणं, हा सातारच्या गादीचा अपमान; सुळेंचा भाजपवर घणाघात

Udayanraje Bhosale: छत्रपती उदयनराजे भोसले यांना लोकसभा उमेदवारीसाठी भाजप दिल्लीवाऱ्या करायला लावत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Supriya Sule On Udaynraje: महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज छत्रपतींची (Shahu Maharaj Chhatrapati) उमेदवारी निश्चित झाली आहे. शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. एकीकडे आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) भोसले यांना उमेदवारीसाठी भाजप दिल्लीवाऱ्या करायला लावत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील भाजपवर टीका केली आहे.

सातारा गादीचे छत्रपती आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यासंबंधी एका प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने उदयनराजे भोसले यांना ताटकळत ठेवून साताऱ्याच्या (Satara) गादीचा केलेला अपमान दुर्देवी आहे. मी व उदयनराजे भोसलेंनी 10 वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यांना मिळालेल्या या वागणुकीच्या आम्हाला वेदना आहेत. भाजप फक्त छत्रपतींचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान व द्वेष करण्याची एकही संधी सोडत नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. पाल्म संडे उत्सवाच्या निमित्ताने त्या दौंड शहरात आल्या होत्या यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उदयनराजेंच्या उमेदवारीवरुन भाजपवर टीका केली आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाजप एवढा छत्रपतींचा सन्मान कोणीच केला नसल्याचा दावा केला आहे. राणेंनी जाहीर कार्यक्रमात छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितले होते? असा सवालदेखील राऊतांना विचारला आहे. राणे म्हणाले, "छत्रपतींच्या गादीचा सन्मान जेवढा आमच्या पंतप्रधानांनी, फडणवीसांनी आणि भाजपने केला आहे, तेवढा कोणीच केलेला नाही. छत्रपती संभाजीराजे याआधी राज्यसभेचे खासदार हे भाजपच्या पाठिंब्यानेच झाले होते. आजही छत्रपती उदयनराजे भोसले, हे आमचे राज्यसभेचे खासदार आहेत. म्हणून छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भाजप एवढा कोणीच केला नाही आणि करणारही नाही."

उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय शहाच घेणार

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. तरीही महायुतीतील काही जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यापैकी सातारा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे नेते, खासदार उदयनराजे भोसले तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत.अद्याप त्यांची दिल्लीश्वरांशी भेट झालेली नाही, तर आज त्यांची शहांशी भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच 'मविआ' उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का?' असा प्रश्नही फडणवीसांनी आघाडीच्या नेत्यांना विचारला आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT