Nitesh Rane On sanjay Raut: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप आहेत. तर पुढचा शिमग्याला राऊत तुरुंगात असतील असा दावाही राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) कंसमामा म्हटलं होतं. राऊतांच्या याच वक्तव्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे शकूनी मामासारखी चाल खेळतात आणि त्यांच्या या चालीनेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीपासून लांब ठेवलं असल्याचा आरोप राणे यांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, "अपेक्षाप्रमाणे शकूनी मामाने परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वी झाले. पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की, वंचित (VBA) आघाडी बरोबरची युती हा शकुनी मामा होऊ देणार नाही. म्हणूनच तो वारंवार अडथळे आणतोय. जेव्हा जेव्हा वंचित आघाडी बरोबर युती करण्याच्या चर्चेची वेळ आली, तेव्हा ही चर्चा कशी बंद होईल, त्यामध्ये कसे अडथळे येतील, यावर या मामाने बारीक लक्ष ठेवलं होतं. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) उबाठा बरोबर आता त्यांची युती संपल्याचं जाहीर केलं आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते पुढे म्हणाले, "याचा हाच अर्थ होतो की, परत एकदा शकुनी मामाने जसं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून आत्ताच्या मातोश्रीला दूर करण्यात हातभार लावला, मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचलं. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या एका बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी हा चंगच बांधलेला दिसतोय की, कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीजवळ येऊ द्यायचं नाही. आपलं घाणेरडे राजकारण करून, वंचित आघाडीला अशा जागा देऊ केल्या की, त्या जागा ते कधीच जिंकू शकत नाहीत. तुम्हाला प्रामाणिकपणे वंचित आघाडीला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला मानसन्मान द्यायचा होता, तर प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या सीट कुठल्याही अटी-शर्ती न लावता दिल्या असत्या, तर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला असता, की खरंच तुम्हाला भिमशक्तीला बरोबर घ्यायचं आहे. मात्र शकुनी मामाने परत एकदा आपली चाल खेळून वंचित बहुजन आघाडीसोबतच्या चर्चेचे सर्व दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेत."
छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भाजपने केला नाही या राऊतांच्या आरोपावर बोलताना नितेश राणे म्हणाले, "छत्रपतींच्या गादीचा सन्मान भाजपने केला नाही हे बोलण्याची हिंमत कोण करतं? तर संजय राऊत. राऊतांना (Sanjay Raut) आठवण करून देईल की,'जाहीर कार्यक्रमात छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितले होते?' कोणी आमच्या मराठा मूक (Maratha) मोर्चाला मुका मोर्चा म्हणून, माता भगिनींचा अपमान केला होता? छत्रपतींच्या गादीचा सन्मान जेवढा आमच्या पंतप्रधानांनी, फडणवीसांनी आणि भाजपने केला आहे, तेवढा कोणीच केलेला नाही. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) याआधी राज्यसभेचे खासदार हे भाजपच्या पाठिंब्याने झाले होते. आजही छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) हे राज्यसभेचे आमचे खासदार आहेत. म्हणून छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भाजप एवढा कोणीच केला नाही आणि करणारही नाही, असं राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांना काही प्रश्न विचारले. राणे म्हणाले, "छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याचा निर्णय का घेतला? ही जागा तर उबाठाकडे होती. 2019 ला उबाठाने कोल्हापूरची लोकसभा जिंकली होती. मग छत्रपती शाहू महाराजांनी मी उबाठावर नाही मी काँग्रेसच्या तिकीटवर लढेन असा निर्णय का घेतला? या प्रश्नाची उत्तर राऊतांनी आणि ठाकरेंनी द्यावी."
शिमग्याला गालबोट लागत आहे अशी खंत संजय राउत यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना राणे म्हणाले, रोज सकाळी उठून महाराष्ट्राच वातावरण खराब करण्याची सुरवात कोणी केली? वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप कोणी केले? शिवाय संजय राऊतांना सांगेन की, शिमगा महोत्सवाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे निश्चित पद्धतीने टिकेल. ते टिकवण्याचं काम ही महाराष्ट्राची जनताच करेल. पुढच्या वर्षीचा शिमगा राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये साजरा करतील. त्यामुळे कोणतही दूषित वातावरण न होता शिमगा साजरा व्हायला सुरुवात होईल, एवढा ठाम विश्वास व्यक्त करतो, असंही राणे म्हणाले. राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं असून केंद्रीय यंत्राणच्या रडारवर आता राऊत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.