Shambhuraj Desai  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : 'कमळाची मतं धनुष्यबाणाला', शंभूराज देसाईंनी केली खुंटी बळकट

Satara Loksabha : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ पाटणला पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी जाहीर सभेचे आयोजन केले होते

हेमंत पवार

Satara Loksabha News : लोकसभा निवडणुकीला कमळाला मतदान करायचे आणि विधानसभेला धनुष्यबाणाला पैरा करायचा, असे आमचे ठरले आहे. त्यानुसार यावेळी उदयनराजे भोसले यांना मतदान करा, विधानसभेला पाटण तालुक्यातील कमळाची मते आपल्या धनुष्यबाणाला मिळतील, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच करून विधानसभेच्या मतांची खुंटी बळकट केली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी दुजोरा देत, यावेळी कमळाला अन् पुढच्यावेळी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना करून पालकमंत्र्यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल दिला.

सातारा लोकसभा Satara Loksabha मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ पाटणला पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी जाहीर सभेचे आयोजन केले होते. मात्र, मुख्यमंत्री न येता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पाटणला सभा झाली. त्यासाठी मंत्री देसाई Shambhuraj Desai यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

देसाई म्हणाले, भाजप व शिवसेना यांचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पैरा ठरला आहे. या पैऱ्यासाठी पाटण तालुक्यातील जनतेशी चार पिढ्यांची नाळ असणारा कार्यकर्ता विधानसभा निवडणुकीसारखा प्रयत्न करून उदयनराजेंना निवडून आणेल आणि विधानसभेला भाजपचे कमळ धनुष्यबाण निवडून आणण्यासाठी मदत करेल.

पाटणच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सभेसाठी पाचारण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही मंत्री देसाई आणि त्यांच्या मैत्रीची माहिती देत सभेसाठी आल्याचे सांगितले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT