Lok Sabha Election News : गळ्यात चपलांचा घालून हार उमेदवाराकडून घरोघरी प्रचार!

Candidate Campaign : तिरुवन्नमलाई येथील अपक्ष उमेदवार आर. जगन्नाथन यांना चप्पल हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. मग काय, त्यांनी स्वत:च्या गळ्यात चपलेचा हार घातला आणि घरोघरी जात प्रचार केला. मतदारसंघातील रस्त्यांवर फेरफटका मारला.
Intendant Candidate
Intendant Candidate Sarkar
Published on
Updated on

संदीप चव्हाण

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत देशभर सर्व पक्षांची धामधूम सुरू आहे. अपक्ष उमेदवाराही आपापल्या परिने मतदारराजांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतान दिसत आहेत. यासाठी ते उमेदवार नवनवीन शक्कल लढवतानाही दिसतात. यातील कुणी गळ्यात चपला घालून प्रचार केला, तर कुणी गाईला दूध पाजलं, कुणी कुणी चमेलीच्या माळा विकल्या तर कुणी चिकन पकोडे शिजवले... मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तामिळनाडूमधील लोकसभा निवडणुकीत प्रचारकांनी काय काय केलं काय सांगू..?

तिरुवन्नमलाई येथील अपक्ष उमेदवार आर. जगन्नाथन यांना चप्पल हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. मग काय, त्यांनी स्वत:च्या गळ्यात चपलेचा हार घातला आणि घरोघरी जात प्रचार केला. मतदारसंघातील रस्त्यांवर फेरफटका मारला, "प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचे" आश्वासन देत स्वतःसाठी प्रचार केला.

मनरेगाचे कार्यदिवस 100 वरून 365 दिवसांपर्यंत वाढवणे, रस्ते आणि रेल्वे सेवा सुधारणे तिरुवन्नमलाई अरुणाचलेश्वर मंदिराच्या भक्तांसाठी संपूर्ण भारतामध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू करणे, आधी आश्वासनंही देऊन टाकली. आई, बायको, नातेवाईक, मित्रांनी त्यांना निवडणूक चिन्ह बदलण्यास सांगितलं पण त्यांनी कुणाचंही न ऐकता त्यांनी स्वत:च्या गळ्यात चपलेचा हार घालण्यात धन्यता मानली. माझ्या मतदारसंघातील 15 लाख मतदार या चिन्हाशी संबंधित आहेत आणि त्यामुळं मतदार आनंदी आहेत," असं जगन्नाथन म्हणाले.

Intendant Candidate
Baramati Pawar Sabha : सुळेंच्या प्रचारसभेत 'तो' व्हिडिओ लावून रोहित पवारांनी केली अजिदादांची कोंडी

केवळ जगन्नाथन नव्हे तर इतर उमेदवार आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीनं प्रचार करण्यावर भर दिला. पक्षाचे उमेदवार एम. एस. धरणीवेदन यांच्या प्रचारासाठी वंदवासी DMK आमदार एस. अंबेथकुमार यांनी तर भाजी मंडईत जाऊन पालेभाज्या विकल्या, द्रमुकचे वंदवासी शहर सचिव दयालन यांनी धरणीवेदन यांच्या रॅलीत चक्क गायीला दूध पाजलं. काही उमेदवारांनी तर चिकन पकोडे शिजवले तर काहींनी चमेलीच्या माळा विकल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Intendant Candidate
Rohit Pawar on Ajit Pawar : आता अजितदादांना मिश्या काढाव्या लागणार; रोहित पवारांचा टोला

एकूणच काय तर मतं मिळवण्यासाठी वाट्टेल ते, असं म्हणत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यात कसलीच कसर ठेवली नाही. मतदानाचे अजून बरेच टप्पे बाकी आहेत. त्यामुळं मतदारांना आकृष्ट करण्यासाठी हे उमेदवार आणि त्यांचे प्रचारक आणखी काय प्रचारकी फंडे वापरतील, हे त्यांचं त्यांनाच माहीत!

(Edited by Sunil Dhumal)

Intendant Candidate
Rohit Pawar On Ajit Pawar : PM मोदींचा फोन कशासाठी येतो? रोहित पवारांची अजितदादांवर प्रश्नांची सरबत्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com