Congress Leader Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha News : भाजप, मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

Maharashtra Political News : महाविकास आघाडीची साताऱ्यात बैठक: संविधानाचे रक्षण करणे हाच जाहीरनामा असल्‍याची केली घोषणा

Umesh Bambare-Patil

Satara Political News : देशातील भाजप, आरएसएस आणि मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या साताऱ्यातील बुधवारच्या बैठकीत करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्ह्या-जिल्ह्यात कृती कार्यक्रम ठरवले जाणार असून, आमचा जाहीरनामा हा संविधान व संविधानातील उद्दिष्टे हाच आहे. त्या उद्दिष्टांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीला मदत करणाऱ्या पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सातारा जिल्हा समन्वय बैठक जिल्हा काँग्रेस कमिटीत झाली. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, डॉ. भारत पाटणकर, नितीन बानुगडे पाटील, लक्ष्मण माने, ॲड. वर्षा देशपांडे, आनंदी अवघडे, चंद्रकांत खंडाईत, भगवान अवघडे, सुनील माने, डॉ. सुरेश जाधव, राजकुमार पाटील, नरेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाने इंग्रजांची फोडा व झोडा ही नीती अवलंबल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी घराघरांत भांडणे लावली. पक्ष फोडले, घरे फोडली, जाती-जातीत भांडणे लावली. धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम केले. त्यांच्या विरोधी लढण्याचा संकल्प आजच्या या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आलेला आहे.’’

सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत. जे मुद्दे जाहीरनाम्यात नक्कीच समाविष्ट केले जातील. आता यापुढे ही एकसंध अशी वज्रमूठ भाजपचा पराभव करूनच थांबेल.

लवकरच जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर बैठका, प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील व भाजप (BJP) विरोधातील धार अधिक तीव्र करून इंडिया आघाडीचा नक्कीच विजय करू, असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला, असे सांगितले. बाळासाहेब पाटील, लक्ष्मण माने, डॉ. भारत पाटणकर, प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला ३८ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदी सरकारविरोधात मोर्चाचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार व राज्य राज्यातील भाजपची सरकारे ही भ्रष्टाचाराची कुरणे झालेली आहेत. त्या विरोधात या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारात भर दिला जाईल, तसेच इलेक्ट्रॉल बाँडची माहिती देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) टाळाटाळ करत असल्याने त्यांच्या विरोधात लवकरच ठिकठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे ही बैठकीत ठरवण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT