Satara palika Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Mayor Election : साताऱ्यात नगराध्यपदासाठी महिला नेत्याची 'वरपर्यंत' लॉबिंग; मुंबईत तळ ठोकून घेतल्या गाठीभेटी

Satara Mayor Election : साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी भाजप नेत्या सुवर्णा पाटील यांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत लॉबिंग सुरू केल्याची चर्चा असून, या घडामोडींनी सातारा शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Satara Nagaradhyaksh : सातारा शहराच्या नगराध्यक्षपद यंदा खुले झाले आहे. त्यामुळे या पदाच्या उमेदवारीसाठी काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण यांच्यापासून अनेक नाव चर्चेत आहेत. यात अगदी राजघराण्यातील वृषालीराजे व वेदांतिकाराजे भोसले यांचेही नाव आघाडीवर आहे. पण या सगळ्यांना मागे टाकून भाजप नेत्या सुवर्णा पाटील यांनी थेट मुंबईतून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी लॉबिंग सुरु केल्याची चर्चा आहे.

गतवेळी साताऱ्याचे नगराध्यक्षपद महिला राखीव होते. त्यामुळे आता पुन्हा महिला नको, असा सूर साताऱ्यातील राजकीय वर्तुळात आळवल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच सुवर्णा पाटील या मुंबईत तळ ठोकून होत्या, अशी चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत बूथपातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच सर्वांच्या कामाची माहिती असते. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करून आम्ही वाटचाल करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षपदासाठीच्या गेल्या निवडणुकीत 13 हजार 800 मते घेतलेल्या भाजप नेत्या सुवर्णा पाटील यांनी सोमवारी सातारा येथे नगराध्यक्षपदासाठी मुलाखत दिली आणि त्यानंतर थेट मुंबई गाठली. त्या मुंबईत तळ ठोकून होत्या, अशी चर्चा साताऱ्यात होती. याविषयी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईला गेले होते; पण तळ ठोकून वगैरे असे काही नाही. आज पहाटेच परतल्याचे त्यांनी नमूद केले.

त्या म्हणाल्या, "जनतेची सेवा करण्यासाठी पदाची अपेक्षा बाळगणे यात काही गैर नाही मग तो पुरुष असो की महिला. देशात पुरुषप्रधान संस्कृती असली, तरी महिला देखील सर्वत्र काम करीत आहेत, हे आपण पाहतोच आहे. गेली १८ वर्षे मी पक्षाचे काम करीत आहे. सन २०११ मध्ये जनतेने मला नगरसेविका करून सेवेची संधी दिली.

गेल्या निवडणुकीत देखील उत्तम साथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना माझे कार्य माहीत आहे. ते सर्व जण योग्य निर्णय घेतील. प्रभाग क्रमांक चारमधून देखील मी मुलाखत दिली आहे. पक्षात काम करणाऱ्याला संधी दिली जाते, हे सर्वज्ञात आहे, असेही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT