CCTV footage from Satara Nagar Parishad office that reportedly disproved the assault allegation made by Corporator Savitri Bedekar. sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : मुख्यधिकाऱ्याने धक्काबुक्की केली, महिला नगरसेविकेच्या सभागृहात आरोप; सीसीटिव्ही समोर येताच सगळे चक्रावले!

Savitri Bedekar Chief Officer Satara : सातारा नगर परिषदेचे मुख्यधिकारी विनोद जळक यांनी धक्काबुक्की केल्याची गंभीर आरोप नगरसेविका सावित्री बडेकर यांनी केला होता. मात्र. सीसीटिव्हीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सत्य समोर आले आहे.

Roshan More

Satara News : सातारा नगर परिषदेमधील नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्यधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. जळक यांनी आपल्याला धक्काबुक्की केली, असे नगरसेविका बडेकर यांनी सभागृहात येत आरोप केला. तसेच नगराध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली.

सातारा नगर परिषदेचे मुख्यधिकारी विनोद जळक यांनी स्पष्टीकरण देताना आपण धक्काबुक्की केली नाही, असे सांगितले. तसेच आपला रस्ता आडवून नगरसेविका बडेकर या कॅबिनमध्येच खुर्ची टाकून बसल्या होत्या. मात्र, आपण जेवढी जागा होती त्यातून येथे सभेसाठी आल्याचे सांगितले. दरम्यान, जळक यांच्या कॅबिनबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

नगरसेविका बडेकर यांनी आपण खोटं बोलत नसून आपल्याला धक्काबुक्की झाली आहे. धक्का मारून मुख्यधिकारी आले, असे म्हटले. नगराध्यक्षांनी याची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. तर, मुख्यधिकारी जळक यांनी झालेली घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामध्ये जर आपण धक्का देतान दिसत असू तर आपल्यावर कारवाई करावी, असे म्हटले.

सीसीटिव्ही तपासला असता नगरसेविका बडेकर या खोटा आरोप करत असल्याचे समोर आले.सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मुख्यधिकारी जळक यांनी कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की केली नाही. सीसीटिव्हीतील व्हिडिओमध्ये नगरसेविकेनेच मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये खुर्ची लावून अडवल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नगरसेविकेवर कारवाईची मागणी

सीसीटिव्ही समोर आल्याने नगरसेविका खोटा आरोप करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरसेविकेचा बनाव उघड झाल्याने आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. मुख्यधिकाऱ्यावर खोटे आरोप करून त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला म्हणून संबंधित नगरसेविकेवर गु्न्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT