Madhi Yatra controversy : मढी यात्रेत धर्माचा ट्विस्ट? मुस्लिमांना दुकानं, प्रशासनच उद्योग करतंय; सरपंचांनी तापवलं वातावरण

Kanifnath Yatra Row: Madhi Sarpanch Sanjay Markad Levels Serious Allegations : पाथर्डीमधील श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना प्रशासन पाठबळ देत असल्याचा आरोप सरपंचाने केला आहे.
Madhi Yatra controversy 2
Madhi Yatra controversy 2Sarkarnama
Published on
Updated on

Muslim shops ban Kanifnath Yatra : पाथर्डी इथल्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने न लावून देण्यावरून दिवसेंदिवस विकोपाला पोचू लागला आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी आता, मुस्लिम व्यावसायिकांवरून थेट प्रशासनाला टार्गेट केलं आहे.

महसूल प्रशासन आणि पोलिस मुस्लिम व्यावसायिकांची पाठराखण करत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावून देणार नाही, अशी भूमिकेचा पुनरूच्चार करत या विषयावर एक मार्चला सकल हिंदू समाजाचा मेळावा मढी इथं आयोजित केल्याची माहिती सरपंच संजय मरकड यांनी जाहीर केली आहे.

सरपंच संजय मरकड म्हणाले, "मढी ग्रामपंचायतीने मढी इथल्या यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यावसायिकांना दुकाने लावण्यास बंदी घातली आहे. महसूल प्रशासन, पोलिस आणि मढी देवस्थानचे विश्वस्त मुस्लिम व्यावसायिकांची पाठराखण करत आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावून देणार नाही." या वेळी आरपीआय आठवले गटाचे नेते अंबादास आरोळे, शरद कुटे, अजय मरकड, अशोक पगारे हे उपस्थित होते.

'हिंदूंना (Hindu) पुढे करून मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने लावून देण्याचा उद्योग प्रांताधिकारी प्रसाद मते व पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे करत आहेत. यामागे मोठे अर्थकारण असून देवस्थानचा कारभार सध्या जी मंडळी पाहत आहे, त्यांना देवस्थानचे काही देणे घेणे नाही,' असा गंभीर आरोप देखील संजय मरकड यांनी केला.

Madhi Yatra controversy 2
Women Political Leaders in India : राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांचा उदय; देशातील पक्षप्रमुख महिला नेत्या पुन्हा प्रकाशझोतात!

'मढी यात्रेच्या नियोजनासाठी अधिकारी येतात. ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. घटनेने ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले आहे. आम्हाला टाळून काही निर्णय घेतला तर मढी यात्रेत पाणी, वीज अशा कोणत्याही सुविधा ग्रामपंचायत उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा बाळगू नका,' असा इशारा देखील संजय मरकड यांनी प्रशासनाला दिला आहे.

Madhi Yatra controversy 2
Maharashtra Budget Session : विधिमंडळात फुलांचा ‘ड्रामा’! भाजप आमदारांचा अनोखा, पण गंभीर मुद्दा! नेमका विषय काय?

देवस्थानचे विश्वस्त हे सेक्युलर पद्धतीने काम करत आहेत. तर या अधिकाऱ्यावर राजकीय दबाव आहे. त्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून यात्रा पार पाडावी, अशी मागणी आपण जिल्हा पोलिस प्रमुखांकडे करणार आहोत. सकल हिंदू समाजाच्या मेळाव्यास आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे, आदिनाथ महाराज शास्त्री, सागर बेग, अशोक महाराज पालवे हे उपस्थित राहणार असल्याचे संजय मरकड यांनी सांगितले.

मुस्लिम व्यावसायिकांना मागील वर्षी बंदी करूनही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. या वर्षीही होणार नाही. राज्यात व देशात हिंदुत्ववादी सरकार असले, तरीही इथले अधिकारी ठोकशाही पद्धतीने काम करत असल्याने यात्रा नियोजनासाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी मागणी करणार असल्याचे संजय मरकड यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com