Mumbai News, 23 Mar : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी दरम्यान मोठा राडा झाला होता. निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फुटले. तर मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याबद्दल ताब्यात घेतल्याने त्यांनाही मतदान करता आलं नव्हतं.
यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची पोलिसांसोबत मोठी झटापट झाली होती. साताऱ्यातील याच सर्व गोंधळाचे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले आहेत. विधान परिषदेत पोलिसांच्या अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह इतर शंभर पोलिसांचं निलंबन करण्याची मागणी केली.
विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच, शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी साताऱ्यातील निवडणुकीबाबात बलायला सुरूवात केली. यावेळी त्यांनी मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांना धक्काबुक्की झाल्याचा मुद्दा उपस्थित करत तुषार दोषी याला सस्पेंड करा, अशी मागणी केली.
त्यांच्या मागणीनंतर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, "हेमंत पाटील आणि विक्रम काळे सदस्यांनी जी घटना मी माझ्या ४० वर्षांच्या राजकारणात कधी अनुभवली नव्हती. साताऱ्यात मी दुर्दैवी अनुभव मी भोगला. निवडणुका होतात बहुमत अल्पमत होत असतं. आम्ही ३३ सदस्य मतदानाला निघालो होतो. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरले होते. शिवाय ज्या सदस्यांवर गुन्हा दाखल झाला ते संदीप मांडवे आणि अनिल देसाई आमच्यासोबत होते.
ज्याचं अपहरण झालं सांगितलं ते बापूसाहेब शिंदे (राष्ट्रवादी) देखील आमच्यासोबत होते. आमच्या बैठकीत देखील ५० पोलीस साध्या वेशात होते. मात्र, तिथे त्यांनी सदस्यांना अटक करण्याचं धाडस केलं नाही. पण सभागृहात मी मकरंद पाटील, नितीन काका आणि शशिकांत शिंदे चौघेच होतो. तिथे त्यांनी या दोघांना अटक केली
मतदानाला सभागृहात जातात तिथे दोन्ही दंडाला माझ्या पोलिसांनी धरलं मला सदस्यासह फरफटत नेल्याचं शंभूराजे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, १०० पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर होते. आम्ही मंत्री आहोत आमदार आहोत. पोलिसांनी एवढा माजूरी पणा केला. त्या गोंधळात माझ्या शर्टावर रक्त सांडलं. आमच्या दोन्ही सदस्यांना पोलिसांनी पळवत नेलं.
मला एकच म्हणायचं आहे या पोलिसांचं पार्टीच्या मिटींगमध्ये धाडस झालं नाही. चौथ्या मजल्यावर भाजपचे ५० कार्यकर्ते आमचा एकपण सोडला नाही. आम्ही चौघे होतो फक्त. आम्हाला न्याय द्या, तो एसपी जे वागलाय ना तो घर गड्यासारखा वागलाय, त्याला तात्काळ निलंबित करा. त्याची निवृत्त हाय कोर्ट जज मार्फत चौकशी करण्याची मागणी करा आणि अरेरावी करणाऱ्या तुषार दोषी, याच्यासह १०० पोलिसांवर कारवाई करत निलंबित करा, अशी मागणी देसाईंनी केली.
या मागणीनंतर उपसभापति नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ज्या पोलिसांनी लोकांना आणि मंत्र्यांना धक्काबुक्की केली. तसंच मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं त्यांचं सरकारने निलंबन करावे, असे आदेश दिले. त्यानंतर मंत्री मकरंद पाटील बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, "परवा साताऱ्यात जी घटना घडली ती राज्याच्या राजकीय विषयाला कलंक लावणारी ठरली. इतक्या वाईट पद्धतीने प्रशासन वागलं आमच्या महिला सदस्या होत्या.
त्यांच्या खोलीची झडती करायला पोलिसांनी दहा गाड्या पाठवल्या. वस्तुस्थीती अशी आहे की, पहिला गुन्हा दाखल झाला. जे तक्रारदार होते त्यांनी सांगितलं की माझ्या बाबतीत कोणतीही जोर जबरदस्ती झालेली नाही. ते स्वत: पोलीस स्टेशनला हजर राहून हे सर्व सांगत आहेत. त्यांनी त्याबाबत वाई पोलिसांत जाऊन जबाब दिला आणि पुन्हा सव्वा सहाला नवा गुन्हा दाखल केला.
मंत्री असताना एखाद्याला आरोपीला वागणूक दिली जाती तशी वागणूक मंत्र्यांना मिळत असेल तर यापेक्षा जास्त दुर्देव काय असू शकत नाही. आरोपीला देखील मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही. मात्र, मतदानाच्या दारात गेलेल्या सदस्यांना पोलिसांनी उचलून नेणं लोकशाहीला काळिमा फासणारी घटना साताऱ्यात घडली. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखाला बडतर्फ करावी अशी मागणी करतो."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.