

Satara News, 23 Mar : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित असा विजय मिळवला. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर भाजपचे राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, या निवडणुकी दरम्यान मोठा राडा झाला होता.
निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फुटले. तर मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याबद्दल ताब्यात घेतल्याने त्यांनाही मतदान करता आले नाही. यावेळी राष्ट्रावादी आणि शिवसेना नेत्यांची आणि मंत्र्यांची पोलिसांसोबत मोठी झटापट झाली होती.
या झटापटीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली होती. मात्र, आता याच सर्व गोंधळाचे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले आहेत. विधान परिषदेत पोलिसांच्या अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर शंभर पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी देसाई यांनी केली.
तर शंभूराजे यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ज्या पोलिसांनी लोकांना आणि मंत्र्यांना धक्काबुक्की केली. तसंच मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं त्यांचं सरकारने निलंबन करावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणं सातारा पोलिसांच्या अंगलट आल्याचं दिसत आहे.
तर विधान परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, "मंत्र्यांना अरेरावी आणि जखमी करणारे पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी आणि त्यांच्या बरोबरचे १०० पोलीस यांच्यावर कारवई करत त्यांचं तात्काळ निलंबित करा. आम्ही सुरक्षित आहोत की नाही असं आम्हाला वाटतंय."
तर देसाई यांच्या मागणीनंतर विधान परिषदेत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "सभागृहात उदय सामंत आणि गणेश नाईक उपस्थित आहेत त्यांना शासनाच्या वतीने काही निवेदन करायचं आहे का? आणि निवेदन नसेल तर मी आताच्या आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस ज्यांनी लोकांना धक्काबुक्की केली. तसंच मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.