Kolhapur News : महायुती राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग विरोधात हजारो शेतकऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्याचा इरादा केला आहे. यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून नियोजना संदर्भात बैठक आज (ता.1) पार पडली. या बैठकीत सतेज पाटील यांनी, महायुतीला धक्का दिला आहे. आंदोलनासाठी आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महायुतीचे दोन मंत्री आणि दोन आमदार आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट सांगत त्यांनी सत्ताधारी महायुतीलाच धक्का दिला आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या आंदोलनाला आणि विरोधासाठी सत्ताधारी गटातील 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहेत. यात कोल्हापुरामधील महायुतीच्या 4 आमदारांचा विरोध आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून त्यातील 4 आमदारांचा या महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. यातील आमदार राजेंद्र पाटील आणि आमदार अशोक माने यांनी शक्तिपीठ संघर्ष समितीला पत्र देवून विरोध दर्शविला आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विरोध असल्याचे सांगितले.
राज नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधकांना आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना सतेज पाटील यांनी, क्षीरसागर यांच्याकडे काही माहिती पुरावे असल्यास त्यांनी उघड करावेत. मोघम बोलण्याला काही अर्थ नाही, असे म्हणत क्षीरसागर यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. तर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीने शाडू कॅबिनेटची निर्मिती केल्यावर सतेज पाटील यांनी देखील त्याचे समर्थन केले आहे. सरकारचे विरोधी धोरण असेल तर विरोधी पक्ष म्हणून आमचा विरोधच असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकार कर्जाच्या खाईत असून राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यामुळेच विरोधी पक्ष म्हणून राज्य वाचवणे हे आमची जबाबदारी आहे. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. उपमुख्यमंत्र्यांना धमकी येत असेल तर कोणाला कायद्याची भीती राहिलेली नाही. राज्यातले विविध प्रश्न घेऊन आम्ही सत्ताधारी सरकारला महाविकास आघाडी म्हणून जाब विचारू, असाही इशारा सतेज पाटील यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हा केवळ आजची गोष्ट नाही. सातत्याने भाजपच्या माध्यमातून अपमान केला जात आहे. महापुरुषांनी आमच्यासाठी इतिहास रचला. तो इतिहास बदलाचा प्रयत्न ही मंडळी करत असल्याचा आरोप देखील सतेज पाटील यांनी यावेळी केला केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.