Dhananjay Mahadik on Satej Patil : ''शाहूंना पुढे करून श्रेय घेण्याचा डाव'', गडकरींना दिलेल्या निवेदनावरून धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला!

Dhananjay Mahadik Politics : ....पण तिथे एक अशी व्यक्ती होती जी निवेदन देताना समोर आली नाही, असही खासदार महाडिकांनी सांगितलं.
Dhananjay Mahadik on Satej Patil
Dhananjay Mahadik on Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur politics updates : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नवीन राजवाडा येथे जाऊन खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार शाहू महाराज यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कोल्हापुरात तावडे हॉटेल ते शिवाजी पुल या दरम्यान उड्डाणपूलाची मागणी केली.

आता यावरून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस(Congress) नेत्यांनाच टोले लगावले आहेत. इतकेच नव्हे तर या मागणी संदर्भात भाजपचे नेते आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला आहे. लवकरच त्या कामातला निधी मंजूर होऊन सुरुवात होईल असा विश्वास देखील महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

Dhananjay Mahadik on Satej Patil
Prakash Abitkar News : आमदार खोसकरांनी मंत्री आबिटकरांना ओळखलेच नाही! अशी झाली फजिती...

धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) पुढे म्हणाले, शहरात रस्ते, उड्डाणपूल होण्यासाठी आमदार अमल महाडिक अनेक वर्ष प्रयत्न करत होते. काही दिवसांपूर्वी अमल महाडिक यांनी व्यापक बैठक घेऊन आराखडा तयार केला होता. त्यामुळे डी पी आर स्टेज इथपर्यंत त्याचे काम झाले आहे. पण काल खासदार महाराजांनी दिलेल्या पत्रकाचा आम्ही सन्मान करतो. पण तिथे एक अशी व्यक्ती होती जी निवेदन देताना समोर आली नाही. हे निवेदन देण्यामागचं ब्रेन त्या व्यक्तीचं होतं. हे काम यापूर्वीच झालेला आहे. काल त्याची घोषणा झाली. आठ वाजता निवेदन दिले आणि नऊ वाजता घोषणा झाली असं होऊ शकत नाही.

पण काही लोकांना श्रेय घ्यायची सवय असते, जाणीवपूर्वक हे घडवून आणले. महाराजांना पुढे करून हे काम त्यांनी केले. असा शब्दात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील(Satej Patil) यांचे नाव न घेता टोले लगावले आहेत. महाराजांची मागणी रास्त आहे, कारण कोल्हापुरात भाविक पर्यटक येतात, वाहतुकीची कोंडी होते. अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे, लवकरच त्याबाबत निधी मंजूर होईल कामाला सुरुवात होईल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Mahadik on Satej Patil
Sharad Pawar NCP : सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; आमदाराच्या फ्लेक्सवरून तुतारी, पवारांचा फोटो गायब, ठाकरे-शिंदेंचे फोटो झळकले!

दोन दिवसांपूर्वी भाजपचा(BJP) पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेळावा पार पडला. पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू आहे. राज्यात महायुतीला लोकांनी समर्थन दिलेला आहे, त्यामुळे लोकांचा ओढा महायुतीकडे आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ घेऊन या सर्वांचा पक्षप्रवेश मुंबईत होणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com