Satej Patil on kolhapur flood situation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : लाडक्या बहिणीसह सरकारने पूरग्रस्तांकडेही लक्ष द्याव; सतेज पाटलांची बोचरी टीका

Rahul Gadkar

राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन लाडकी बहीण ही योजना घरो घरी पोचवण्यासाठी व्यस्त आहे. पण त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील लाडक्या पूरग्रस्तांना विसरू नये. पूरग्रस्तांचे नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सानुग्रह अनुदान द्यावे. राज्य सरकारचे पहिले कर्तव्य आहे. अशी बोचरी टीका माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली. पूरग्रस्तांच्या पाहाणी दरम्यान त्यांनी कोल्हापुरात (Kolhapur) हे वक्तव्य केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर सध्या ओसरत असला तरी अनेक भागाचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर मधली शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या पात्राबाहेर पडल्याने अनेकांची घर पाण्यात बुडाली आहेत.

या परिस्थितीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पूरग्रस्त दौरा करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ताम्रपर्णी नदीतील गाळ न काढल्याने आणि येथे तयार करण्यात आलेला पूल यामुळे 2019, 2021 आणि आता 2024 ला या नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत शिरत असून मोठ नुकसान होत असल्याचं सांगितल. तसेच राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आजरा तालुक्यात केवळ 30% पंचनामे झाले आहेत अद्याप 70% पंचनामे शिल्लक आहेत. प्रशासन कोणत्या कामात व्यस्त आहे? लाडकी बहीण योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाची आहे.

मात्र पूरग्रस्तकडे देखील सरकारने लक्षात द्यावं आणि नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करणे आणि त्यांना सानुग्रह अनुदान देण हे शासनाचा पहिलं कर्तव्य असायला पाहिजे अशी टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच ज्या घरात पाणी आलेला आहे त्या सर्वांना कागदी घोडे नाचवण्याऐवजी सरळ हाताने शासनाने मदत दिली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT