Kolhapur Flood : कोल्हापुरातील पूरस्थितीला अलमट्टी धरणासोबत 'हा' बंधारा कारणीभूत; भाजप नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Kolhapur Flood Satyajeet Kadam : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात महापुराची स्थिती गंभीर बनण्यामागे रुईचा बंधारा तितकाच जबाबदार आहे. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नाना कदम यांनी केला आहे
Satyajeet Kadam
Satyajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Rain News : दरवर्षी कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला अलमट्टी धरणाला जबाबदार धरले जाते. पण त्यासोबत कोल्हापुरातील काही बंधारेही याला कारणीभूत आहेत. महापुरातील नुकसानासाठी 100 कोटींची मदत करतील पण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सात कोटी खर्च करणार नाहीत, असा संताप भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात महापुराची स्थिती गंभीर बनण्यामागे रुईचा बंधारा तितकाच जबाबदार आहे. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असून या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा नाना कदम यांनी दिला आहे.

केले गावानजीक रस्त्यासाठी भराव टाकला आहे. त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली गाव पाण्याखाली जाते. त्याच पद्धतीने तावडे हॉटेल पासून पंचगंगा नदीतून पाणी कितीही प्रवाहीत झाले तरी पुढे जाऊन रोहित बंधाऱ्यामुळे त्याचा फुगवटा आजूबाजूच्या गावात तयार होतो. वारंवार याबाबत जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहे.

त्याची कल्पना मी त्यांना दिली आहे. मात्र दरवर्षी येणाऱ्या महापुरात नुकसानग्रस्तांना 100 कोटी वाटतील पण सात कोटीत होणाऱ्या बंधार्‍याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत नाही. असा आरोप कदम यांनी केला आहे.

Satyajeet Kadam
Shivsena Politics News : 'आमदार आमचा, त्यामुळे मतदारसंघही आमचा' शिवसेनेचा दावा

महापुराला अलमट्टी धरणाला जबाबदार धरून चालणार नाही तर त्यामध्ये कर्नाटक मधील हिप्परगी धरण देखील जबाबदार आहे. हिप्परगी धरणाची पाणी सोडण्याची क्षमता केवळ दोन लाखच आहे. मग अलमट्टी धरणातून तीन-साडेतीन लाख क्यूसेक विसर्ग करून महापूर कमी होणार आहे का?

त्यामुळे हिप्परगी धरणाचे देखील प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. जलसंपदा विभागाने ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे. या दोन्ही प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तक्रार अर्ज दिला आहे. असे कदम यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Satyajeet Kadam
Salil Deshmukh: भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही; सलील देशमुखांनी सुनावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com