Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापूर शहरसह ग्रामीण भागात महापुराची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. करवीरसह कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही भागात महापुराचे पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी संधी साधत पुराच्या पाण्यात गाडीवर बॅनर लावून ते स्वार झाल्याचे दिसत आहे.
पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी अनेक इच्छुक पुढे सरसावल्याचे दिसून येते. पूरग्रस्त भागातील जनावरांना स्थलांतरित करण्यासाठी अनेक इच्छुकांनी थेट वाहनं उपलब्ध करून दिली आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघासह कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी, पन्हाळा शाहूवाडी आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांसह इच्छुकही कामाला लागले आहेत.
कोल्हापूर(Kolhapur) शहरासह परिसरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. पुराचा सर्वाधिक फटका करवीर तालुक्यातील चिखलीसह आंबेवाडी गावाला बसतो. ही दोन गावे करवीर विधानसभा मतदारसंघात येतात. या गावांच्या मदतीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार पुढे सरसावले आहेत.
आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी स्वतः महापुराच्या पाण्यातून दोन वेळा गाडी घालत चिखली आणि आंबेवाडी गावाला भेट दिली. तर व्हिजन चारिटेबल ट्रस्टचे घोरपडे यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या जनावरांचे स्थलांतर करण्यासाठी थेट बॅनर लावून वाहन उपलब्ध करून दिले. शिवाय चिखलीसह आरे, सडोली, दोनवडे, खुपिरे, कोगे,पाडळी, हळदी यासह अन्य पूरग्रस्त गावात संपर्क करून परिस्थितीचा आढावा सुरू ठेवला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील 35 टक्के भाग सध्या पाण्याखाली गेला आहे. कालपासून इच्छुकांनी आणि आजीमाजी आमदारांनी परिस्थितीचा आढावा घेत शासनाला सूचना केल्या आहेत. आमदार जयश्रीताई जाधव, माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पूरग्रस्त भागात पाहणी केली आहे. तर कृष्णराज महाडिक, भाजपचे नेते सत्यजित नाना कदम यांनी देखील पूरग्रस्त भागात भेटी देऊन त्यांना मदत करण्याची कार्य सुरू ठेवली आहे.
इतकेच नव्हे तर करवीर विधानसभा मतदारसंघात मदत करत असताना इच्छुक आणि थेट सोशल मीडियावर आपला प्रचार जोरात सुरू केला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.