Satej Patil News : 'गोकुळ'मधील घडामोडी आणि चार शासन नियुक्त सदस्यांच्या विरोधात आज सतेज पाटील हे कोल्हापूरातील ऐताहासिक दसरा चौकातून संघर्ष मोर्चा काढत आहे. दरम्यान, या मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चाला जमलेल्या गर्दीची चर्चा सुरू झाली आहे.
मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. दसरा चौक परिसर गर्दीने फुलून गेला आहे.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांनी विविध प्रतिकात्मक पुतळे आणि फलकांच्या माध्यमातून महायुती सरकारचा तीव्र निषेध केला आहे. महायुती सरकारविरोधात काळे झेंडे घेत शेतकरी सहभागी झाले आहेत.
महायुती सरकार हे कायद्याच्या विरोधात वागत असून शेतकऱ्यांवर सूड उगवत असल्याची संतप्त भावना मोर्चात सहभागी झालेल्यांनी व्यक्त केली. निवडणूक पराभव झाल्याने महायुती सरकारने हा डाव टाकल्याचेही मोर्चेकरी म्हणत होते.
'लोकशाहीला फाशी' देत असलेल्या प्रतिकात्मक पोस्टर देखील या मोर्चात झळकले आहेत. या पोस्टरद्वारे महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या हातात काळे झेंडे असल्यामुळे संपूर्ण दसरा चौक परिसर निषेधाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज समविचार आघाडीचा मोर्चा होत असताना संध्याकाळी महायुतीची बैठक पार पडणार आहे.मोर्चाला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर महायुतीची पुढची रणनीती या बैठकीत ठरवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, महायुतीमध्ये गोकुळचे अध्यक्षपद भाजपकडे देण्याची हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी चेतन नरके यांचे नाव आघाडीवर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.