

Satej Patil News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पेचप्रसंगाविषयी भाष्य केले. त्यांनी कोरअमचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शासन नियुक्त सदस्याना मतदानाचा अधिकार देण्याचे समर्थन केले. त्यानंतर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत सतेज पाटलांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार महाडिक यांना सतेज पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. या विषयी त्यांनी सविस्तर पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.
सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली .साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली.त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते.
'असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे.', असे पाटील यांनी म्हटले आहे.
'जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ?' असा सवाल त्यांनी केला आहे.
गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे.आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.