कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील सत्तासंघर्ष आणि राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा' काढण्यात येत आहे. गोकुळच्या 25 पैकी काँग्रेसच्या समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. कोरम (गणसंख्या) अभावी अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली असून, कोर्टाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबरला बैठक होणार आहे.