Pune Graduates Election News : पुणे पदवीधर निवडणुकीचे वेध आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना लागले आहेत. अशातच महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांचा अश्वमेध सोडल्याचे जाहीर केले होते.
तर दुसरीकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. अशातच पुणे पदवीधराच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला असताना याचीच संधी साधून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या स्टेजवरून थेट भैया माने यांच्यासाठीच उमेदवारीचा खडा टाकला आहे.
गोकुळ दूध संघाच्या आज (ता.15) वर्धापन दिनानिमित्त आईस्क्रीम प्रॉडक्टच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गोकुळ शिरगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला गोकुळ मधील सर्व संचालक आणि प्रमुख नेते यांची उपस्थिती होती. मात्र गोकुळ दूध संघाच्या या कार्यक्रमात पदवीधरच्या उमेदवारीची चर्चा जोरात रंगली. महायुतीमधील पदवीधरच्या उमेदवारीवरून सुरू असलेले राजकारण पाहता काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत सूचक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
सतेज पाटील हे भाषणाला उभे राहीले असता व्यासपीठावरील प्रमुख नेत्यांची नावं घेत असताना भैय्या माने त्यांना स्टेजवर दिसले नाहीत. यावेळी भैय्या माने दिसत नाहीत ते कुठे गेले? असे विचारत सतेज पाटील यांनी चांगलाच चिमटा काढला. महायुतीच्या भांडणांमध्ये भैय्या माने यांना उमेदवारी मिळेल मला असे वाटत नाही. त्यांना उमेदवारीची लॉटरी लागेल असे मला वाटत नाही. त्यावेळी आम्ही त्यांच्यासाठी पर्याय आहोत. असे विधान केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
एकीकडे पदवीधर मधून भैया माने हे इच्छुक आहेत. दुसरीकडे महायुती मधून ही जागा भाजपने सुरुवातीपासूनच आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सांगलीचे शरद लाड यांचा भाजप पक्ष प्रवेश करून उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे भैय्या माने हे पदवीधरची निवडणूक लढणार की थांबणार? अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.