Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत ट्विस्ट : महायुतीकडे बहुमत असतानाही काँग्रेसचा मोठा निर्णय

Mahayuti vs MVA Politics : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीत अद्याप निर्णय झाला नसून महाविकास आघाडीही निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mahayuti leaders meet in Mumbai to finalize Kolhapur Zilla Parishad President and municipal committee chairperson posts amid BJP-NCP tussle.
Mahayuti leaders meet in Mumbai to finalize Kolhapur Zilla Parishad President and municipal committee chairperson posts amid BJP-NCP tussle.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur ZP News : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे सोपवण्यासाठी तयार झाल्याचे सांगितले जाते. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचवेळी काँग्रेससह महाविकास आघाडीकडूनही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे. महाविकास आघाडीकडून कोणत्या सदस्यांचा अर्ज भरला जाणार यावर चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असू शकतो याचे आडाखे बांधून आपला उमेदवार कोण यावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये सध्या जोरदार खलबते सुरू आहेत.

जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी महायुतीकडे बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यामुळे नामुष्की टाळण्यासाठी ऐनवेळी काँग्रेसने माघार घेतल्यास अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Mahayuti leaders meet in Mumbai to finalize Kolhapur Zilla Parishad President and municipal committee chairperson posts amid BJP-NCP tussle.
Kolhapur News: महायुतीकडून शेवटच्या दहा मिनिटांत राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम'; परिवहन समितीचं सभापतीपद हातून निसटलं

सतेज पाटलांसोबतच्या दोस्तानाला पूर्णविराम :

मंगळवारी (17 मार्च) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे. लवकरच आमच्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत निर्णय होईल. महानगरपालिकेत ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर झाला, तसाच अध्यक्षपदाबाबतही निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे. त्यानुसार जिल्हा परिषेदत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल, असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याबद्दल दोस्तानाला पूर्णविराम दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com