Kirit Somaiya, Satej Patil
Kirit Somaiya, Satej Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

म्हणून सोमय्यांना कोल्हापुरात बंदी घातली होती; सतेज पाटलांनी सांगितले कारण

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) 27 सप्टेंबरला कोल्हापूरला जाणार आहेत. त्या विषयी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले, किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे बंदी घालण्यात आली होती. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी ही सांगितलेले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यासाठी आता बंदी नाही, त्यांची कुठेही अडवणूक केली जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

मागच्या वेळेस त्यांना संपूर्ण दौरा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला नव्हता. त्यामुळे तेंव्हा तसा निर्णय घ्यावा लागला, असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, काल आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रदद्द करण्यात आल्या होत्या. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. एकावेळी अशा परीक्षा घेणे हे महाकष्टाचे काम असते, असे ते म्हणले.

लाखो विद्यार्थी जेंव्हा परीक्षेला बसतात तेंव्हा परीक्षा पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे. एखाद्या तांत्रिक मुद्यामुळे अडचण आली असती तर प्रचंड गोंधळ झाला असता, त्यामुळे तुमच्या भवितव्यासाठीच परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असल्याचे पाटील यांनी सांगितले. यापुढे जी परीक्षा घेण्यात येईल त्यातून तांत्रिक मुद्दे निघून जातील याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेणार, असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारतर्फे राबवली जाणारी ही पहिलीच भरती प्रक्रियेची परीक्षा होती. पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT