भाजप आमदार सुनील कांबळेंची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

संबंधित महिला अधिकारी ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ट पदावर काम करतात.
MLA Sunil Kamble
MLA Sunil Kamblesarkarnama

पुणे : पुण्यातील भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भाजपचे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपच्या बाबतीत आम्ही पुष्टी देत नाही. या संदर्भात आमदार कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

MLA Sunil Kamble
केंद्रीय मंत्री म्हणाले, हॅरिस उपराष्ट्रपती झाल्या, मग सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत

संबंधित महिला अधिकारी ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ट पदावर काम करतात. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरुन त्यांच्याशी संपर्क साधला. संबंधित महिला अधिकाऱ्यानेही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांनी परवानगी घ्यावी लागले असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला घाणेरड्या शब्दात शिविगाळ केली.

MLA Sunil Kamble
पुण्यात फिरकू न देण्याचा मुळीकांचा इशारा अन् राऊतांचा थेट वडगाव शेरीतच मेळावा

संबंधित महिला अधिकाऱ्यांनी मोबाईल कार्यकर्त्यांच्या हातात दिला. त्यावर कांबळे यांनी पुन्हा एकदा अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. या मोबाईल रेकॅार्डिंगचे संभाषण आता व्हायरल झाले आहे. मात्र, हे संभाषण काही महिन्यांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com