हा भाजपला नव्हे खडसेंनाच धक्का!

मुक्ताईनगर व बोदवड येथील भाजपच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath Khadsesarkarnama
Published on
Updated on

जळगाव : बोदवड, मुक्ताईनगर येथील भाजप नगरसेवक शिवसेनेत गेले, ते मुळातच भाजपचे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे समर्थक होते. त्यामुळे हा खडसे यांना खऱ्या अर्थाने धक्का आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. (Girish Mahajan criticizes Eknath Khadse)

Girish Mahajan, Eknath Khadse
पुण्यात फिरकू न देण्याचा मुळीकांचा इशारा अन् राऊतांचा थेट वडगाव शेरीतच मेळावा

मुक्ताईनगर व बोदवड येथील भाजपच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाजन म्हणाले, भारतीय जनता पक्षाला कुठलाही धक्का नाही. हे गेलेले नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. खडसे यांचीच ती माणसे होती. खरे तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणे अपेक्षित होती. मात्र कुणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले नाही.

Girish Mahajan, Eknath Khadse
भाजप आमदार सुनील कांबळेंची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुक्ताईनगरात भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे. खडसे यांच्या कोथळी गावात त्यांचा सरपंच नाही. आज बोदवड येथेही तीच परिस्थिती आहे. ते म्हणतात माझा मतदार संघ माझ, माझ आज त्यांचे तिथे काय, आता निवडणुका होईल त्या वेळी आम्ही दाखवू भाजप तिथे काय आहे ते, गेल्या तीस वर्षांपासून खडसे तिथे भाजपचे आमदार होते, पक्षाने त्यांना मंत्री केले होते. लाल दिव्याची गाडी त्यांना दिली होती.

त्यामुळे निवडून आलेली माणसे त्यांची होती. मात्र, आता ही माणसे त्यांची राहिलेली नाहीत.शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ते गेलेले आहेत. मात्र, येत्या पाच ते सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाचे अस्तितव दाखवून देणार आहोत, अशा इशारा महाजन यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com