Satej Patil on Sharad pawar .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil On Sharad Pawar: सतेज पाटील म्हणतात, ...तर आमची भूमिका शरद पवारांना समजावून सांगणार!

Satej Patil On Raj And Uddhav Thackeray Unity : जर राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असतील, मराठी भाषेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यात हिंदी भाषा सक्तीची केली जात असल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच दोन्ही ठाकरे बंधूनी या विरोधात आवाज उठवला आहे. त्यासंदर्भात त्यांनी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात हे दोन बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यावर आज काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

जर राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असतील, मराठी भाषेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे. शिवसेना, मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये फोन झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मात्र, काँग्रेसला मोर्चात सहभागी होण्यासाठी संपर्क झाला आहे का यावर बोलताना मात्र आपल्याला या संदर्भात माहिती असल्याचे स्पष्टीकरण आमदार पाटील यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही बंधू एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर चांगलीच बाब आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची गुगली टाकल्याने त्यावर देखील सतेज पाटील यांनी बोलणे टाळले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर त्यांचा प्रश्न आहे, मी त्यावर बोलणे योग्य नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. .

एक जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम करतील. त्यामुळे किमान आता तरी शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांची भूमिका सरकार समजून घेतील असं वाटतं. आम्ही सर्वजण दोन दिवसांत शरद पवार यांची भेट घेणार आहे. गरज नसताना हा महामार्ग का केला जातोय ही भूमिका आम्ही त्यांना पटवून देऊ.

महामार्ग आपल्या राज्याचा आहे, तो केंद्राचा नाही. त्यामुळे तो कर्नाटकात घेऊन जाण्याचा प्रश्न येतच नाही. हा प्रयत्न चुकीचा आहे. कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी घ्यावी लागेल. राज्य सरकार आता सगळ्यांची कुचेष्टा करत असल्याची टीका सतेज पाटलांनी केली.

लाडक्या बहिणी वरून बोलताना सध्या राज्य सरकारमधील नेत्यांकडून,लाडक्या बहिणी बाबत कशा पद्धतीने बोललं जात होतं हे आपण ऐकलं आहे. आता लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपला जर शेतकऱ्याबद्दल थोडं जरी काही वाटत असेल तर त्यांनी बबन लोणीकरांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT