BJP New President: दिल्लीतून सर्वात मोठी अपडेट, महाराष्ट्र भाजपला आठवडाभरात मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष? 'या' नेत्याकडे धुरा सोपवली

BJP POlitical News : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यानं आता भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की नवख्या चेहर्‍याला संधी दिली जाते, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचेच लक्ष लागलेल्या महाराष्ट्र भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिल्लीतून मोठी अपडेट समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नियुक्त्यांनंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची निवडही अंतिम टप्प्यात आल्याचं दिसून येत आहे. कारण आता चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी भाजप नेमकी कोणाला संधी मिळणार,याची उत्सुकता आहे.

याचदरम्यान, आता भाजपच्या दिल्लीतून पक्षनेतृत्वानं संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपच्या गोटात आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग आला आहे. याचमुळे केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नियुक्ती करत भाजपनं प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या दृष्टीनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. याचमुळे कदाचित पुढील आठवड्याभरात महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar News : मुश्रीफांना भिडण्याची जबाबदारी घाटगेंकडेच! पवारांनी एका कृतीतूनच केलं स्पष्ट

भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद',असा नियम आहे.त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार,याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी भाजप नेमकी कोणाला संधी मिळणार,याची उत्सुकता आहे.

केंद्रीय निरीक्षक म्हणून किरेन रिजिजू हे संसदीय कामकाजाचे 28 वे मंत्री आणि 7वे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे आता महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Hasan Mushrif : मुश्रीफांनी मिरजेत घेतलं भाजपला अंगावर? म्हणाले, 'भावी आमदार...'

मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावलण्यात आले आहे.त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अनुभवी ज्येष्ठाकडे देण्याची तयारी भाजपनं केल्याची सूत्राची माहिती आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यानं आता भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की नवख्या चेहर्‍याला संधी दिली जाते,याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण,असतील याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या आघाडीवर आहे.रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Bharat Gogawale : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर गोगावलेंचा संताप; म्हणाले, 'कोण? काहीही...'

तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. कोकणात भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com