Sandipan Bhumre: शिवसेना खासदार संदिपान भुमरे अडचणीत? ड्रायव्हरला तब्बल 150 कोटींची जमीन गिफ्ट...; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचे ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल यांना हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांकडून तब्बल 150 कोटींची तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
Sandipan Bhumre And Vilas Bhumre  (1).jpg
Sandipan Bhumre And Vilas Bhumre (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वादाचा धुरळा बसत नाही, शिवसेनेचे मंत्री व आमदार संजय शिरसाट आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातला वाद पेटला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संदिपान भुमरेंबाबत (Sandipan Bhumre) धक्कादायक बातमी समोर आली आहे.

शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल यांना हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांकडून तब्बल 150 कोटींची तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून खासदार संदीपान भुमरे,आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची चौकशी सुरू करणयात आली आहे. परभणीतील एका वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहर पोलिसांच्या आर्थिक गणेश शाखेनं आता याप्रकरणी चौकशीसाठी ड्रायव्हर जावेद रसूल याला बोलावल्याची माहिती आहे.तसेच याविषयी आता आर्थिक गणेश शाखेनं रसूल यांना इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रती,उत्पन्न यांसह गिफ्ट डीड याबाबतची माहिती देण्याचे स्पष्ट सूचना केल्या आहेत.

Sandipan Bhumre And Vilas Bhumre  (1).jpg
BJP New President: दिल्लीतून सर्वात मोठी अपडेट, महाराष्ट्र भाजपला आठवडाभरात मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष? 'या' नेत्याकडे धुरा सोपवली

याबाबत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले,जावेद रसूल हे आमचे ड्रायव्हर आहेत.परंतु,त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाही, शहरातील जागा गिफ्ट दीड ज्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

आमदार भुमरेंच्या ड्रायव्हरला जमीन भेट म्हणून दिलेल्या जंग कुटुंबाकडे निजामकालीन व्यवस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी होती. जंग कुटुंबाला निजामसंस्थानच्या कार्यकाळात एक प्रमुख कुलीन कुटुंब म्हणून ओळखलं जात असत. आता सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या 'हिबानामा' कराराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com