Satej Patil Radhakrishna Vikhe Patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : सतेज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, विखे पाटलांनी दिलं उत्तर...

Rahul Gadkar

Kolhapur : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचे दोन नंबर व्यवसाय आहेत ते लवकरच भाजपमध्ये येतील असा दावा केला होता. मात्र, महायुतीतील नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच क्षीरसागर यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

आमदार सतेज पाटलांचा कोणता व्यवसाय आहे. मला माहिती नाही पण त्यांचा दोन नंबरचा व्यवसाय म्हणून ते भाजपमध्ये येतात याचा शोध कोणी लावला हे मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आज सपत्नीक राधाकृष्ण विखे पाटील हे दर्शनासाठी आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सडकून टीका केली . काँग्रेसच्या न्याय यात्रेत उरलेले राज्यही जातील.राहुल गांधींची यात्रा काही नवीन नाही. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या यात्रेनंतर तीन राज्यात दारुण पराभव झाला. आत्ताच्या यात्रेमुळे जी राज्य शिल्लक आहेत ती सुद्धा जातील. पक्षाचे नव्हे तर नेतेही पक्षात राहणार नाहीत, असा टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती राजाराम कारखान्याच्या एमडींना दोन दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीबद्दल विखे पाटील यांनी खंत व्यक्त केली. सहकार क्षेत्रातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला मारहाण करणे योग्य नाही. कोणी कायदा हातात घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांच्याकडे दाद मागायला हवी होती. कायदा हातात घेणे योग्य नाही,असे विखे पाटील म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT